Lokmat Money > बिझनेस न्यूज > "हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!

"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!

"जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे बघता, तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपण काय योग्य कामे केली."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 09:30 AM2024-10-10T09:30:40+5:302024-10-10T09:31:25+5:30

"जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे बघता, तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपण काय योग्य कामे केली."

ratan tata had told the story about becoming chairman their wish and Only one advice was given to people | "हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!

"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!


रतन टाटा यांनी फेसबुक पेज 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' वर आपल्या जीवनातील अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. मार्च 2020 मध्ये याच्या तिसऱ्या भागात त्यांनी आपण निवृत्त झाल्याचे सांगितले होते. टाटा म्हणतात, "आता अनेक वेळा लोक मला सल्ला मागतात की पुढे काय करायला हवे? मी सांगतो, जी गोष्ट अपरिवर्तित राहते, ती आहे काही चांगले करण्याची इच्छा. यामुळे मी एवढेच सांगतो की, सल्ला विसरून जा. जे  तुम्हाला योग्य वाटते तेच करा." 

"जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे बघता, तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपण काय योग्य कामे केली. ते पुढे म्हणतात, मी आयुष्यभर टाटा समूहाच्या विकासाचा विचार केला. जेव्हा मी टाटा समूहाचा चेअरमन झालो, तेव्हा हे पद मला माझ्या 'टाटा' आडनावामुळे मिळाले आहे, असेच सर्वांना वाटले. मात्र मझी काहीतरी मोठे करण्याची इच्छा होते.

एवढे मोठे की, जे आपल्या सर्वांपेक्षा मोठे असेल. हे टाटाच्या  डीएनएमध्ये आहे. समाजाला काही तर परत करण्याच्या इच्छेनेच मला नॅनो बनवण्यासाठी प्रेरित केले. रतन टाटा यांनी फेसबुक पेज 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'मध्ये आपल्या कहाणीचा तिसरा आणि अखेरचा भाग शेअर केला आहे.

यात त्यांनी, चेअरमन असताना अपली जीवन शैली, तीन महिलांसोबत लग्नाच्या अगदी जवळपर्यंत पोहोचणे, नॅनो कारच्या निर्मितीचा विचार, यांसह सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यातील काही महत्वांचे पैलूं शेअर केले आहेत. 

"जमशेदपूरमध्ये काम करणारे आमचे टाटा स्टील आणि टाटा मोटर्सचे कर्मचारी अत्यंत समृद्ध होते. मात्र जवळपासच्या ग्रामीण भागातील लोक अत्यंत गरीब. या भागातील लोकांचे राहणीमान उंचावण्याचा विडा आम्ही उचलला आणि यशस्वीही झालो.

अशी प्रत्यक्षात उतरली नॅनो बनवण्याची संकल्पना -
नॅनोसंदर्भात रतन टाटा यांनी सांगिले आहे की, "नॅनो बनवण्याची संकल्पनाही याच पद्धतीने प्रत्यक्षात आली. मी एके दिवशी मुंबईच्या मुसळधार पावसात एका कुटुंबातील चार जणांना मोटारसायकलवरून जाताना बघितले. पर्याय नसल्याने ते आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालत होते. हे बघितल्यानंतर मी, देशातील जनतेसाठी स्वस्तातली नॅनो कार तयार केली. मात्र, जेव्हा ही कार जेव्हा लॉन्च करण्यात आली, तेव्हा तिची किंमत खूप अधिक होती. मात्र मी मध्यमवर्गीयांसाठी कार बनवणार, असा शब्द दिला होता. म्हणून मी ती बनवली. आज जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा मला माझ्या नॅनो कारचा अभिमान वाटतो."

Web Title: ratan tata had told the story about becoming chairman their wish and Only one advice was given to people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.