रतन टाटा यांचे श्वान प्रेम सर्वांनाच माहीत आहे. आपल्या आजारी श्वानासाठी अथवा कुत्र्यासाठी त्यांनी चक्क ब्रिटेनच्या शाही परिवाराचा अवार्ड देखील नाकारला होता. महत्वाचे म्हणजे, रतन टाटा यांना केवळ महागडे कुत्रेच नाही, तर रस्त्यांवर फिरणारे कुत्रेही आवडतात. गोव्यावरून अॅडोप्ट केलेला एक स्ट्रीट डॉग तर त्यांच्या सोबत त्यांचे ऑफिस देखील शेअर करतो. हा कुत्रा अनेक वेळा टाटांसोबत मिटिंग्स दरम्यानही दिसतो. रतन टाटा यांचे श्वानप्रेम पुन्हा एकदा लोकांसमोर आले आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
टाटांना मुंबईच्या रस्त्यावर सापडला कुत्रा -
या पोस्टमध्ये टाटांनी म्हटले आहे की, त्यांना मुंबईच्या रस्त्यावर एक श्वान अथवा कुत्ता सापडला आहे. ते आता त्या कुत्र्याच्या मालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या पोस्ट सोबत संबंधित कुत्र्याचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्यांना हा कुत्रा बुधवारी रात्रीच्या सुमारास सायन रुग्णालयाजवळ आढळला. रतन टाटांचा स्टाफ या कुत्र्याची चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाले रतन टाटा -
टाटांनी इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे, 'माझ्या कार्यालयाला काल रात्री मुंबईच्या सायन रुग्णालयात एक हारवलेला कुत्रा सापडला आहे. जर तो आपला असेल अथवा आपल्याकडे त्याचा काही पत्ता असेल, तर कृपया मालकी हक्काच्या काही पुराव्यांसह reportlostdog@gmail.com वर ईमेल करावा. तो सद्या आणच्या निगराणीत असून त्याची काळजी घेतली जात आहे. त्याला झालेल्या जखमांवरही उपचार करण्यात आला आहे.'
टाटांच्या या पोस्टवर युजर्सनी देखील गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी टाटांच्या या श्वान प्रेमाचे प्रचंड कौतुक केले आहे.