Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ratan Tata News : ब्रिटनच्या राजघराण्याने पायघड्या पसरलेल्या, पण रतन टाटा गेलेच नाहीत; कारण समजताच जगानं केलेलं कौतुक

Ratan Tata News : ब्रिटनच्या राजघराण्याने पायघड्या पसरलेल्या, पण रतन टाटा गेलेच नाहीत; कारण समजताच जगानं केलेलं कौतुक

Ratan Tata News : रतन टाटांच्या उदारतेच्या, माणुसकीच्या आणि नम्रतेचे अनेक किस्से आहेत. पण, त्यातील एक किस्सा असाही आहे, ज्यावरून रतन टाटा आपल्या प्रियजनांची किती काळजी करत होते हे दिसून येतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 10:02 AM2024-10-10T10:02:36+5:302024-10-10T10:03:11+5:30

Ratan Tata News : रतन टाटांच्या उदारतेच्या, माणुसकीच्या आणि नम्रतेचे अनेक किस्से आहेत. पण, त्यातील एक किस्सा असाही आहे, ज्यावरून रतन टाटा आपल्या प्रियजनांची किती काळजी करत होते हे दिसून येतं.

Ratan Tata News Special invitation from the royal family of britain but Ratan Tata clearly refused Read the touching story | Ratan Tata News : ब्रिटनच्या राजघराण्याने पायघड्या पसरलेल्या, पण रतन टाटा गेलेच नाहीत; कारण समजताच जगानं केलेलं कौतुक

Ratan Tata News : ब्रिटनच्या राजघराण्याने पायघड्या पसरलेल्या, पण रतन टाटा गेलेच नाहीत; कारण समजताच जगानं केलेलं कौतुक

Ratan Tata News : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या आठवणी आणि त्यांचे महान कार्य सर्वांच्याच कायम स्मरणात राहतील. रतन टाटांच्या उदारतेच्या, माणुसकीच्या आणि नम्रतेचे अनेक किस्से आहेत. पण, त्यातील एक किस्सा असाही आहे, ज्यावरून रतन टाटा आपल्या प्रियजनांची किती काळजी करत होते हे दिसून येतं. प्रसिद्ध उद्योगपती सुहैल सेठ यांनी रतन टाटा यांचा एक हृदयस्पर्शी किस्सा शेअर केला. 

सुहैल सेठ यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, फेब्रुवारी २०१८ मध्ये ब्रिटिश राजघराण्याला रतन टाटा यांना लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कारानं सन्मानित करायचं होतं. खुद्द प्रिन्स चार्ल्स त्यांना ही उपाधी देऊन सन्मानित करणार होते. मात्र, रतन टाटा यांनी येण्यास नकार दिला आणि त्यामागचे कारण प्रिन्स चार्ल्स यांच्या मनाला स्पर्शून गेलं.

काय म्हणालेले रतन टाटा?

६ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रिन्स चार्ल्स रतन टाटा यांना लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डदेऊन सन्मानित करणार होते. बकिंगहॅम पॅलेसमध्ये हा भव्य सोहळा होणार होता. मी ३ फेब्रुवारीला लंडन विमानतळावर उतरलो. या दरम्यान मी फोन चेक केला आणि माझ्या मोबाईलवर रतन टाटांचे ११ मिस्ड कॉल होते, असं सुहैल सेठ म्हणाले.  

"जेव्हा रतन टाटा यांना पुन्हा फोन केला तेव्हा त्यांनी आपण या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही असं म्हटलं. टँगो आणि टिटो आजारी असल्यामुळे आपण येऊ शकत नाही, असं ते म्हणाले होते. त्यांना अशा परिस्थितीत सोडता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं," असा किस्सा सुहैल सेठ यांनी शेअर केला.
जेव्हा आपण हा किस्सा प्रिन्स चार्ल्स यांच्यासोबत शेअर केला आणि त्यांचे श्वान आजारी असल्यानं ते येऊ शकत नाही असं म्हटलं. त्यावेळी प्रिन्स चार्ल्स यांनी 'दॅट्स द मॅन' असं म्हटल्याचं सुहैल सेठ म्हणाले.

Web Title: Ratan Tata News Special invitation from the royal family of britain but Ratan Tata clearly refused Read the touching story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.