टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचं निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा १९९१ ते २०१२ या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष होते. या काळात टाटा समूहाच्या नफ्यात ५१ पटीनं, तर मार्केट कॅपमध्ये ३३ पटीनं वाढ झाली.
टाटा समूहाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अनेक स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. अलीकडेच त्यांनी ब्रोकरेज प्लॅटफॉर्म अपस्टोक्समधील आपला ०.०६ टक्के हिस्सा सुमारे २० लाख डॉलर (सुमारे १८ कोटी रुपये) मध्ये विकला. कंपनीतील मूळ गुंतवणुकीवर त्यांना २३ हजारटक्के परतावा मिळाला.
अनेक दशकं टाटा समूहाचं नेतृत्व केल्यानंतर ८० वर्षीय रतन टाटा यांनी एंजेल इनव्हेस्टर म्हणून शेकडो स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. आता त्यांचं मूल्यांकन वाढलं आहे. अपस्टॉक्सच्या आधी रतन टाटा यांनी आयपीओच्या माध्यमातून बेबी केअर प्लॅटफॉर्म फर्स्टक्रायचे काही शेअर्स विकले होते.
कधी खरेदी केलेला हिस्सा?
अपस्टॉक्समधील शेअरविक्री बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा ब्रोकरेज कंपनीतील सुरुवातीची गुंतवणूक काढून घ्यायची होती आणि त्यानंतर नफा कमवायचा होता. टाटांनी २०१६ मध्ये अपस्टॉक्समध्ये १.३३ टक्के हिस्सा खरेदी केला होता.