Join us  

रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 8:04 AM

भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले...

जगातील सर्वात प्रभावशाली उद्योगपतींपैकी एक आणि भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरच श्वास घेतला. त्याच्याकडे 30 हून अधिक कंपन्या होत्या. ज्यांचा विस्तार 100 हून अधिक देशांमध्ये झाला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण जगातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि आनंद महिंद्रा यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'मी एक प्रिय मित्र गमवला' -रिलायन्सचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, "भारत आणि भारतीय उद्योगांसाठी हा एक अत्यंत दुःखद दिवस आहे. रतन टाटा यांचे निधन हे केवळ टाटा समूहाचेच नाही, तर प्रत्येक भारतीयाचे मोठे नुकसान आहे. वैयक्तिक पातळीवर, रतन टाटा यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे, कारण मी एक प्रिय मित्र गमावला आहे."

"त्यांच्या सारखे दिग्गज अमर राहतात" -अब्जाधीश गौतम अदानी म्हणाले, भारताने एक दिग्गज, एक दूरदर्शी व्यक्ती गमावली आहे. जिने आधुनिक भारताचा मार्ग रीडिफाइन केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "रतन टाटा हे केवळ एक व्यवसायिक नेते नव्हते, तर त्यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि व्यापक हितासाठी एक अतूट वचनबद्धतेसह भारताच्या भावनांना मूर्त रूप दिले. त्यांचा सारखा दिग्गज अमर राहो. ओम शांती."

भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान -ऑटो क्षेत्रातील दिग्गज आनंद महिंद्रा म्हणाले, "भारताची अर्तव्यवस्था एक ऐतिहासिक झेप घेण्याच्या मार्गावर आहे आणि आपण या स्थितीत येण्यासाठी टाटा यांच्या जीवनाचे आणि कार्याचे प्रचंड योगदान आहे." 

टॅग्स :रतन टाटाव्यवसायटाटामुकेश अंबानीगौतम अदानीआनंद महिंद्रा