Lokmat Money > बिझनेस न्यूज > मराठमोळ्या दाम्पत्याच्या स्टार्टअपची खुद्द रतन टाटांकडून दखल; मार्गदर्शन करण्याचे दिले आश्वासन

मराठमोळ्या दाम्पत्याच्या स्टार्टअपची खुद्द रतन टाटांकडून दखल; मार्गदर्शन करण्याचे दिले आश्वासन

या स्टार्टअपचा बिझनेस १८८ शहरात पसरला असून, ३०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. पाहा, डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 10:55 PM2022-01-30T22:55:29+5:302022-01-30T22:56:54+5:30

या स्टार्टअपचा बिझनेस १८८ शहरात पसरला असून, ३०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. पाहा, डिटेल्स...

ratan tata praised repoz energy a company in walunj pune provides diesel home delivery | मराठमोळ्या दाम्पत्याच्या स्टार्टअपची खुद्द रतन टाटांकडून दखल; मार्गदर्शन करण्याचे दिले आश्वासन

मराठमोळ्या दाम्पत्याच्या स्टार्टअपची खुद्द रतन टाटांकडून दखल; मार्गदर्शन करण्याचे दिले आश्वासन

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून भारतातील स्टार्टअपची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. केंद्रातील मोदी सरकारकडूनही स्टार्टअपना प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा कायमच तरुणाईचे प्रेरणास्थान ठरले आहेत. मात्र, पुण्यातील एका मराठमोळ्या दाम्पत्याच्या स्टार्टअपची खुद्द रतन टाटा (Ratan Tata) यांनी दखल घेतली असून, या दाम्पत्याला स्टार्टअपसाठी मार्गदर्शन करण्याचे आश्वासनही दिले असल्याची माहिती दिली आहे. 

आताच्या घडीला अगदी फ्लिपकार्डपासून ते अ‍ॅमेझॉनपर्यंत अनेकविध कंपन्या होम डिलिव्हरी करतात. साबणापासून ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत अनेक वस्तूची ऑर्डर घरबसल्या करता येते. मात्र, पुण्यातील एका दाम्पत्याने थेट डिझेलची होम डिलिव्हरी करण्याचे अनोखे स्टार्टअप सुरू केले आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. 

काय आहे स्टार्टअप?

चेतन वाळुंज (Chetan Valunj) आणि आदिती भोसले (Aditi Bhosale) असे या दाम्पत्याचे नाव असून, रिपोज एनर्जी (Repos Energy) नावाचे स्टार्टअप त्यांनी सुरू केले आहे. ही कंपनी डिझेल घरपोच देण्याची सोय करते. आदिती यांनी फॉरेन्सिक आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात शिक्षण घेतले आहे. तर, चेतन आपल्या घरचा पेट्रोल पंपाचा व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे. पुण्यातील खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे रतन टाटा यांच्या पाठिंब्याने वाळुंज कुटुंबाने उभारलेल्या रिपोज एनर्जी या कंपनीला यावर्षीचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार मिळाला आहे.

रतन टाटा यांनी घेतली दखल

रिपोज एनर्जी या स्टार्टअपची दखल खुद्द रतन टाटा यांनी घेतली आहे. रतन टाटा यांनी या दोघांनाही चर्चेसाठी आमंत्रित केले होते. रतन टाटा यांनी त्यांच्या या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या रिपोज एनर्जी कंपनीत ३०० हून अधिक कर्मचारी काम करतात. इतकेच नाही तर त्यांचा व्यवसाय आता १८८ पेक्षा जास्त शहरात कार्यरत आहे. या ब्रँडच्या माध्यमातून ‘डेड मायलेज’ची एक दुर्लक्षित समस्या सोडवण्याचे काम ते करतात. वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी इंधन स्टेशनवर जाण्याचा वेळ वाचावा आणि त्यातून सुटका व्हावी या उद्देशाने या दोघांनी डिझेलची होम डिलिव्हरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, सातत्याने पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी जायचे, तिथेही लांबच लांब रांगात वेळ घालवणे, अतिशय कंटाळवाणे असते. मालवाहतूक करणारी वाहने तसेच शहरापासून दूरवर काम करणाऱ्या ट्रॅक्टर किंवा मग जेसीबी, क्रेन इत्यादी गोष्टी असणाऱ्यांनाही या परिस्थितीला सामोरे जावे लागते. पंपांवरून अशा ठिकाणी इंधन नेईपर्यंत, ते मोठ्या प्रमाणात वाया जाते. हे वाया जाणारे इंधन तसेच वेळ या इंधानाची योग्य प्रकारे त्याची वाहतूक केली तर हा वाया जाणारे इंधन तसेच वेळ वाचवता येऊ शकतो, हा विचार या दांपत्याच्या डोक्यात आला. त्यातून त्यांनी‘रिपोज एनर्जी’ हा स्टार्टअप सुरु केला. 
 

Web Title: ratan tata praised repoz energy a company in walunj pune provides diesel home delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.