Lokmat Money > बिझनेस न्यूज > रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन...

रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन...

Ratan Tata: देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा, यांनी एक नवा विक्रम केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 06:20 PM2023-10-10T18:20:33+5:302023-10-10T18:21:14+5:30

Ratan Tata: देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा, यांनी एक नवा विक्रम केला आहे.

Ratan Tata: Ratan Tata overtakes Anand Mahindra; Became number one on social media... | रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन...

रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन...

Ratan Tata: देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी एक नवा विक्रम केला आहे. रतन टाटा यांनी आनंद महिंद्रा यांना मागे टाकत, सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे भारतीय उद्योगपती बनले आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, रतन टाटा यांचे X वर 12.6 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. यासोबतच रतन टाटा भारतातील व्यावसायिक जगतात, सर्वाधिक फॉलोअर्स असणारे व्यक्ती बनले आहेत.

360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023
360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, रतन टाटा भारतातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे उद्योगपती बनले आहेत. त्यांच्यानंतर आनंद महिंद्रा यांचे नाव आहे, ज्यांचे 10.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. हुरुन इंडिया आणि 360 वन वेल्थ यांनी संयुक्तपणे 360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 प्रकाशित केली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची ही 12वी वार्षिक आवृत्ती आहे.

एका वर्षात रतन टाटांचे फॉलोअर्स 8 लाखांनी वाढले
रतन टाटा यांचे सध्या 12.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. एका वर्षात त्यांच्या फॉलोअर्समध्ये 8 लाखांची लक्षणीय वाढ झाली आहे. रतन टाटा हे X (पूर्वीचे ट्विटर) वर फारसे सक्रिय नसतात. पण, त्यांची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते.

अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 
हुरुन इंडिया आणि 360 वन वेल्थ रिच लिस्ट 2023नुसार, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत. जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या हिंडनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाच्या एकूण संपत्तीत लक्षणीय घट झाली, ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे गौतम अदानी आता दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.

Web Title: Ratan Tata: Ratan Tata overtakes Anand Mahindra; Became number one on social media...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.