Ratan Tata: देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी एक नवा विक्रम केला आहे. रतन टाटा यांनी आनंद महिंद्रा यांना मागे टाकत, सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे भारतीय उद्योगपती बनले आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, रतन टाटा यांचे X वर 12.6 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. यासोबतच रतन टाटा भारतातील व्यावसायिक जगतात, सर्वाधिक फॉलोअर्स असणारे व्यक्ती बनले आहेत.
360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, रतन टाटा भारतातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे उद्योगपती बनले आहेत. त्यांच्यानंतर आनंद महिंद्रा यांचे नाव आहे, ज्यांचे 10.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. हुरुन इंडिया आणि 360 वन वेल्थ यांनी संयुक्तपणे 360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 प्रकाशित केली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची ही 12वी वार्षिक आवृत्ती आहे.
एका वर्षात रतन टाटांचे फॉलोअर्स 8 लाखांनी वाढलेरतन टाटा यांचे सध्या 12.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. एका वर्षात त्यांच्या फॉलोअर्समध्ये 8 लाखांची लक्षणीय वाढ झाली आहे. रतन टाटा हे X (पूर्वीचे ट्विटर) वर फारसे सक्रिय नसतात. पण, त्यांची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते.
अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हुरुन इंडिया आणि 360 वन वेल्थ रिच लिस्ट 2023नुसार, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत. जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या हिंडनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाच्या एकूण संपत्तीत लक्षणीय घट झाली, ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे गौतम अदानी आता दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.