Ambani Family Tribute to Ratan Tata : टाटा समूहाचे मार्गदर्शक रतन टाटा (Ratan Tata) आता या जगात नाहीत. 9 ऑक्टोबर 2024 रोजी रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनानंतर भारतासह जगभरात शोक व्यक्त करण्यात आला. टाटांच्या अंत्यविधीला तर उद्योग जगतासह अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.
दरम्यान, आज (15 ऑक्टोबर 2024) रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रतन टाटा यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात रिलायन्स समूहाकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याशिवाय या कार्यक्रमात रतन टाटा यांचे वर्ण देशाचे महान सुपुत्र, असे करण्यात आले.
नीता अंबानी म्हणाल्या...रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक दिवाळी डिनरला संबोधित करताना नीता अंबानी म्हणाल्या की, रतन टाटा एक महान व्यक्ती होते. त्यांची व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी अतिशय तल्लख होती. ते आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यासाठी दान करायेच. ज्यावेळी देशाला गरज पडली, तेव्हा रतन टाटा खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी नेहमीच व्यवसाय, तसेच कर्मचारी आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांना खूप दुःख झाले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांनीही रतन टाटा यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
जुन्या दिवसांची आठवण करून देताना नीता अंबानी म्हणाल्या की, रतन टाटा हे माझे सासरे धीरूभाई अंबानी यांचे केवळ चांगले मित्र नव्हते, तर आमच्यासाठी घरातली व्यक्तीप्रमाणे होते. ते नेहमी आमच्याशी खुप आपुलकीने वागायचे. माझा मुलगा आकाश अंबानी यालाही त्यांनी अनेकवेळा मार्गदर्शन केले. यावेळी मुकेश अंबानीदेखील खूप भावूक दिसले.