Lokmat Money > बिझनेस न्यूज > फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 

फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 

Ratan Tata Story: फोर्ड फुल फॉर्मात होती. या विक्री व्यवहारावेळी फोर्डच्या मालकाने टाटा मोटर्स खरेदी करून आम्ही तुमच्यावर उपकार करत असल्याचे टाटांना ऐकविले होते. टाटांनी तिथेच व्यवहार मोडला होता व भारतात परतले होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 07:45 AM2024-10-10T07:45:20+5:302024-10-10T07:46:13+5:30

Ratan Tata Story: फोर्ड फुल फॉर्मात होती. या विक्री व्यवहारावेळी फोर्डच्या मालकाने टाटा मोटर्स खरेदी करून आम्ही तुमच्यावर उपकार करत असल्याचे टाटांना ऐकविले होते. टाटांनी तिथेच व्यवहार मोडला होता व भारतात परतले होते. 

Ratan Tata returns to India after Ford insult; As the cycle of time went, after 9 years... tata own two ford brands  | फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 

फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 

टाटा मोटर्सचा पॅसेंजर व्हेईकल विभाग प्रचंड तोट्यात चालला होता. टाटाच्या कार काही केल्या चालत नव्हत्या. मारुती, महिंद्राने अख्खे मार्केट काबीज केले होते. यामुळे रतन टाटा (Ratan Tata) यांनी टाटा मोटर्सची पॅसेंजर व्हेईकल डिपार्टमेंट विकायचा निर्णय घेतला होता. यासाठी ते अमेरिकेत फोर्डकडे गेले होते. तेव्हा फोर्ड फुल फॉर्मात होती. या विक्री व्यवहारावेळी फोर्डच्या मालकाने टाटा मोटर्स खरेदी करून आम्ही तुमच्यावर उपकार करत असल्याचे टाटांना ऐकविले होते. टाटांनी तिथेच व्यवहार मोडला होता व भारतात परतले होते. 

तेव्हापासून टाटा मोटर्सची पॅसेंजर कार डिव्हिजन यशस्वी करण्याचा त्यांनी चंग बांधला होता. पॅसेंजर कार डिव्हिजन सुरू करण्यासाठी तुम्हाला अनुभव आणि ज्ञान नव्हते, मग तुम्ही हा निर्णय का घेतला. तुम्ही हा व्यवसाय सुरू करायचा नव्हता, असे फोर्डने ऐकविले होते. या अपमानाचा बदला अखेर टाटा यांनी घेतलाच. 

यासाठी टाटांना ९ वर्षे वाट पहावी लागली होती. 2008 मध्ये अमेरिकेत मोठी मंदी आली होती. दहा वर्षांपूर्वी टाटांना त्यांच्या परिस्थितीवरून बोल सुनावणारी फोर्ड ही कंपनी मंदीच्या जात्यात अडकली होती. दिवाळखोर होते की काय अशी परिस्थीती. या फोर्डकडून रतन टाटांनी 'जग्वार' आणि 'लँड रोव्हर' खरेदी केली होती. एकप्रकारे टाटांनीच फोर्डवर मोठे उपकार केले होते. 

अखेर पश्चाताप झालेला फोर्डचा मालक टाटांना म्हणाला होता. ''तुम्ही हे ब्रँड्स खरेदी करून आमच्यावर मोठे उपकार करत आहात.'', असे फोर्डचा मालक टाटांना म्हणाला होता. 

नेमके काय घडलेले....
बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीजचे चेअरमन वेदांत बिर्ला यांनी ट्विटरवर याबद्दल सांगितले होते. वेदांतपूर्वी, टाटा समूहाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान संपूर्ण कथा सांगितली होती. टाटा कॅपिटलचे प्रमुख प्रवीण कडले यांच्या म्हणण्यानुसार, 1999 मध्ये अमेरिकेतील डेट्रॉईट येथे झालेल्या अपमानानंतर कंपनीची टीम त्याच संध्याकाळी न्यूयॉर्कला परतली. टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा त्या तेव्हा खूप नैराश्यात होते. पण, काळाचे चक्र फिरले आणि टाटा पुन्हा यशस्वी झाले.

 

Web Title: Ratan Tata returns to India after Ford insult; As the cycle of time went, after 9 years... tata own two ford brands 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.