Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘रतन टाटा यांनी त्या प्रस्तावाची माहिती द्यावी’

‘रतन टाटा यांनी त्या प्रस्तावाची माहिती द्यावी’

टाटा स्टीलच्या ब्रिटनमधील व्यवस्थापनाने केलेल्या कराराबाबतची माहिती द्यावी

By admin | Published: October 31, 2016 06:36 AM2016-10-31T06:36:48+5:302016-10-31T06:36:48+5:30

टाटा स्टीलच्या ब्रिटनमधील व्यवस्थापनाने केलेल्या कराराबाबतची माहिती द्यावी

'Ratan Tata should give information about that proposal' | ‘रतन टाटा यांनी त्या प्रस्तावाची माहिती द्यावी’

‘रतन टाटा यांनी त्या प्रस्तावाची माहिती द्यावी’


मुंबई : टाटा स्टीलच्या ब्रिटनमधील व्यवस्थापनाने केलेल्या कराराबाबतची माहिती द्यावी, अशी मागणी द नॅशनल ट्रेड युनियन स्टील को-आॅर्डिनेटिंग कमिटी (एनटीयूएससीसी), कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांनी रतन टाटा यांना करतानाच, या कराराला तीव्र विरोध केला आहे.
ब्रिटनमधील तोट्यातील एक योजना विक्री करण्याचा विचार असल्याची माहिती टाटा स्टीलने मार्चमध्ये दिली होती. टाटा स्टीलने अन्य एका कंपनीसोबत चर्चाही सुरू केली होती, पण ब्रेक्झिटनंतर ही चर्चा ठप्प झाली. आता टाटामधील अध्यक्षांना हटविल्यानंतर ब्रिटनमधील ट्रेड युनियनच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.
तथापि, ब्रिटनमधील त्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविणार नसल्याचे ट्रेड युनियनच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. ट्रेड युनियनने अशीही मागणी केली आहे की, ब्रिटनमधील त्या योजनेतील कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी. (प्रतिनिधी)

Web Title: 'Ratan Tata should give information about that proposal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.