Join us

रतन टाटांचा 'या' व्यक्तीवर सर्वाधिक विश्वास; सांभाळतात 11 लाख कोटींचा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 2:39 PM

टाटा समूहात उच्च पदावर असण्यासोबतच हे देशातील सर्वाधिक पगार घेणारे व्यक्ती आहेत.

Ratan Tata: भारतातील उद्योगपतींमध्ये रतन टाटा यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. त्यांनी फक्त टाटा समूहाला नव्या उंचीवरच नेले नाही, तर देशासह जगभरातील तरुण उद्योजगांसाठी आदर्श व्यक्तीमत्व बनले. त्यांनी टाटा समूहाबाबत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत, ज्याचे आजही लोक कौतुक करतात. आज आम्ही तुम्हाला रतन टाटांनी घेतलेल्या अशाच एका निर्णयाबद्दल सांगणार आहोत. टाटांनी त्यांच्या 11 लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाची जबाबदारी एका अशा व्यक्तीच्या खांद्यावर दिली, जो त्यांच्या खुप जवळचा मानला जातो.

आम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत, त्यांचे नाव एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) आहे. त्यांना प्रेमाने लोक नटराजन म्हणतात. ते टाटा समूहातील टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी 2009 ते 2017 पर्यंत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे CEO आणि MD म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली TCS ने 2015-2016 या आर्थिक वर्षात $16.5 अब्ज (सुमारे 1.36 लाख कोटी) ची कमाई केली, ज्यामुळे ही भारतातील सर्वात मौल्यवान खाजगी कंपनी म्हणून ओळखली गेली.

अशी झाली सुरुवात...नटराजन यांनी तमिळनाडूच्या कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अप्लाइड सायन्सेसमध्ये पदवी आणि तिरुचिरापल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (MCA) मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 1987 मध्ये त्यांनी TCS मधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. इंटर्न म्हणून सुरुवात करणारे चंद्रशेखरन कंपनीच्या सर्वोच्च पदावर गेले. 

त्यांच्या नेतृत्वात कंपनीची मोठी वाढटाटा सन्सच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून एन चंद्रशेखरन डिजिटल इनोव्हेशन, स्टेबिलिटी आणि सप्लाय चेनला सुलभ करण्यात भूमिका बजावताना दिसतात. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग, मोबाईल टेक्नॉलॉजी, कस्टमर इंटरनेट प्लॅटफॉर्म आणि 5G च्या वाढीमध्येही त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज टाटा सन्सचे मूल्यांकन 11 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने नुकतेच एअर इंडियाचे अधिग्रहण केले आहे.

सर्वाधिक पगारी व्यक्तीतुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एन चंद्रशेखरन भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या लोकांच्या यादीत आहे. त्यांनी 2019 साठी 65 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज घेतले होते. ते भारतातील सर्वात जास्त पगार घेणारे बिझनेस एक्झिक्युटिव्ह आहेत.

टॅग्स :रतन टाटाटाटागुंतवणूकव्यवसाय