नवी दिल्ली : टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी अॅपवर टॅक्सी बुकिंगची सेवा देणाऱ्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये (ओईएम) गुंतवणूक केली आहे. ओलाने सोमवारी याबाबतची माहिती दिली.
ओलाने याबाबत म्हटले आहे की, रतन टाटा यांची ही खासगी गुंतवणूक आहे. याचा टाटा समूहाशी संबंध नाही. यापूर्वी त्यांनी ओलाची सहयोगी कंपनी एएनआयमध्येही गुंतवणूक केली होती. अर्थात, टाटा यांच्या गुंतवणुकीची विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही.
ओला इलेक्ट्रिककडून इलेक्ट्रिक मोबिलिटी इको सिस्टीम, चार्जिंगच्या पायाभूत सुविधा, स्वॅपिंग मोडल्स विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चार्जिंगबाबत उपाययोजना, बॅटरी स्वॅपिंग स्टेशन आणि अन्य योजनांवर ओला काम करीत
आहे. ओलाच्या नागपूरमधील इलेक्ट्रिक मोबिलिटी पायलट प्रोग्रामसाठी
ओला इलेक्ट्रिकची स्थापना
करण्यात आली होती. याला चांगला प्रतिसाद मिळाला. २०२१ पर्यंत भारतीय रस्त्यांवर दहा लाख इलेक्ट्रिक वाहने धावतील, अशा मिशनची घोषणा ओलाने केली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण भारत सरकारने स्वीकारले आहे. त्यासाठी भारतभर चार्जिंग सुविधा उभारण्यात येत आहेत.
आमच्यासाठी ते प्रेरणा आणि गुरू
ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी सांगितले की,
ओलाच्या एवढ्या वर्षांच्या प्रवासाला आकार देण्याचे काम टाटांनी केले आहे. आमच्यासाठी ते प्रेरणा आणि गुरू आहेत.
ते दूरदर्शी आहेत. त्यांनी उद्योजकांच्या एका पिढीला प्रोत्साहन दिलेले आहे,
पे्ररित केलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूप फायदा होत आहे.
त्यामुळेच २०२१ पर्यंत आम्ही देशातील रस्त्यांवर १० लाख इलेक्ट्रिक वाहने उतरविण्याचा निश्चय केला आहे.
रतन टाटा यांची ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये मोठी गुंतवणूक
टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी अॅपवर टॅक्सी बुकिंगची सेवा देणाऱ्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये (ओईएम) गुंतवणूक केली आहे. ओलाने सोमवारी याबाबतची माहिती दिली.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 04:03 AM2019-05-07T04:03:37+5:302019-05-07T04:15:46+5:30