Lokmat Money > बिझनेस न्यूज > रतन टाटांची कंपनी उभारणार जेवर एअरपोर्ट, L&Tसह दिग्गज कंपन्यांना धोबीपछाड

रतन टाटांची कंपनी उभारणार जेवर एअरपोर्ट, L&Tसह दिग्गज कंपन्यांना धोबीपछाड

प्रयागराज विमानतळानंतर आता नोएडा विमानतळाच्या बांधकामाचा प्रोजेक्ट टाटांना मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 03:38 PM2022-06-03T15:38:48+5:302022-06-03T15:39:05+5:30

प्रयागराज विमानतळानंतर आता नोएडा विमानतळाच्या बांधकामाचा प्रोजेक्ट टाटांना मिळाला आहे.

Ratan Tata's Tata Project Limited to build Noida's Jewar airport | रतन टाटांची कंपनी उभारणार जेवर एअरपोर्ट, L&Tसह दिग्गज कंपन्यांना धोबीपछाड

रतन टाटांची कंपनी उभारणार जेवर एअरपोर्ट, L&Tसह दिग्गज कंपन्यांना धोबीपछाड


नवी दिल्ली: उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (YIAPL) ने नोएडा येथील विमानतळाच्या बांधकाम आणि संचालनासाठी साठी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडसोबत(Tata Projects Limited) भागीदारी केली आहे. टाटांची कंपनी टर्मिनल, धावपट्टी आणि इतर संबंधित इमारती बांधणार आहे. 

टाटा समुहाचा दुसरा प्रकल्प
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी, टर्मिनल, रस्ते, इतर सुविधा, एअरसाइड पायाभूत सुविधा आणि इतर अनुषंगिक इमारतींचे बांधकाम या करारामध्ये समाविष्ट आहे. नोएडा विमानतळाचा पहिला टप्पा पुढील दोन वर्षांत तयार होण्याची अपेक्षा आहे. हा टाटा समुहाने हाती घेतलेला दुसरा विमानतळ प्रकल्प आहे, यापूर्वी प्रयागराज (अलाहाबाद) विमानतळ टर्मिनलचे काम टाटांकडे आहे.

YIAPL ही स्विस-आधारित झुरिच विमानतळ आंतरराष्ट्रीय एजीची उपकंपनी आहे. या कंपनीला नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी सोबत घेण्यात आले आहे. YIAPL ने नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकामसाठी टाटाची निवड केली आहे. मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची रचना, खरेदी आणि बांधकाम यातील अनुभवाच्या आधारावर कंपनीची शेवटच्या तीनमधून निवड करण्यात आली.

टाटांनी या कंपन्यांना मागे टाकले
या शर्यतीत लार्सन अँड टुब्रो(L&T) आणि शापूरजी पालोनजी यांसारख्या मोठ्या कंपन्या सामील होत्या. मात्र सर्वाधिक पसंती टाटा समूहाला मिळाली. टाटा समूहाला L&) आणि शापूरजी पालोनजी यांच्यापेक्षा गुणवत्ता आणि निवड प्रक्रियेसाठी अनुसरलेल्या खर्चावर आधारित निवड निकषांमध्ये जास्त गुण मिळाले.
 

Web Title: Ratan Tata's Tata Project Limited to build Noida's Jewar airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.