नवी दिल्ली : सरकारने चालू आर्थिक वर्षात सामान्य भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) आणि इतर संबंधित योजनांवरील व्याजदर ८.७ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
अर्थमंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचारी, रेल्वे आणि लष्करी कर्मचाऱ्यांच्या जीपीएफवर ८.७ टक्के व्याजदर लागू असेल आणि तो एक एप्रिल २०१५ पासून लागू होईल. लोक भविष्य निधीचा (पीपीएफ) व्याजदर ८.७ टक्केच ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे सरकारने इतर लघु बचत योजनांसाठी व्याजदरात वाढ केली आहे. याअंतर्गत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठीचा व्याजदर ९.२ टक्क्यांवरून वाढवून ९.३ टक्के करण्यात आला आहे. सुकन्या समृद्धी खात्यासाठीचा व्याजदर ९.१ टक्क्यांवरून वाढवून ९.२ टक्के करण्यात आला आहे. मात्र, किसान विकास पत्रावरील व्याजदर ८.७ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
जीपीएफवरील व्याजदर ८.७ टक्क्यांवर कायम
सरकारने चालू आर्थिक वर्षात सामान्य भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) आणि इतर संबंधित योजनांवरील व्याजदर ८.७ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
By admin | Published: April 22, 2015 02:50 AM2015-04-22T02:50:04+5:302015-04-22T02:50:04+5:30