Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वसामान्यांना मोठा दिलासा, रेशन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवली, अशाप्रकारे करू शकता लिंक

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, रेशन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवली, अशाप्रकारे करू शकता लिंक

Ration Card-Aadhar Linking : सरकारने रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 निश्चित केली होती. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 09:38 AM2023-03-29T09:38:07+5:302023-03-29T09:38:55+5:30

Ration Card-Aadhar Linking : सरकारने रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 निश्चित केली होती. 

ration card aadhar card linking online and offline till 30 june 2023 | सर्वसामान्यांना मोठा दिलासा, रेशन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवली, अशाप्रकारे करू शकता लिंक

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, रेशन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवली, अशाप्रकारे करू शकता लिंक

नवी दिल्ली : सध्याच्या काळात आधार कार्ड हे एक महत्वाचे दस्तावेज बनले आहे. सर्वच ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल, तर तुम्ही सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत रेशनचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही आता 30 जून 2023 पर्यंत रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. कारण, सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत आणखी तीन महिन्यांसाठी वाढवली आहे. यापूर्वी, सरकारने रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 निश्चित केली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कोणत्याही लाभार्थींचे रेशन कार्ड रद्द केले जाणार नाही किंवा कोणाच्याही नावावर होणार नाही, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता 30 जून 2023 पर्यंत रेशन कार्डशी आधार क्रमांक लिंक करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आता ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. यासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या...

ऑनलाइन करू शकता आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक
- सर्वात आधी तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत UIDAI च्या वेब पोर्टलला भेट द्यावी लागेल.  
- 'स्टार्ट नाऊ' पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर पुढे जा आणि तुमचा पत्ता तपशील - जिल्हा आणि राज्य प्रविष्ट करा.
- उपलब्ध पर्यायांमधून 'रेशन कार्ड' म्हणून लाभाचा प्रकार निवडा. योजनेचे नाव 'रेशन कार्ड' म्हणून निवडा.
- यानंतर रेशनकार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक, ई-मेल पत्ता आणि मोबाइल क्रमांक टाका.
- तुमच्या मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल आणि तो फॉर्ममध्ये टाकावा लागेल.
- ओटीपी एंटर करा, त्यानंतर तुम्हाला तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देणारी सूचना मिळेल.
- हे पोस्ट केल्यानंतर, तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि योग्य पडताळणीनंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डला लिंक केले जाईल.

ऑफलाइन करू शकता रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक 
- सर्वात आधी तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक वितरण प्रणाली किंवा PDS केंद्र किंवा रेशन दुकानात जा.
-  तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची फोटोकॉपी, कुटुंब प्रमुखाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि  रेशनकार्ड सोबत ठेवा.
- तुमचे बँक खाते तुमच्या आधारशी लिंक केलेले नसल्यास, तुमच्या पासबुकची फोटो कॉपी जमा करा.
- रेशन दुकानावर सर्व कागदपत्रे तुमच्या आधार कार्ड क्रमांकाच्या फोटो कॉपीसह जमा करा.
- अधिकारी तुमचे बायोमेट्रिक तपशील जसे की तुमचे बोटांचे ठसे कॅप्चर करतील आणि आधार प्रमाणीकरणासाठी ते सत्यापित करतील.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि तुमच्याद्वारे सर्व कागदपत्रे सबमिट केल्यानंतर, तुमच्या आधारमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवला जाईल.
- रेशन कार्ड-आधार लिंक पूर्ण झाल्यावर तुम्हाला अतिरिक्त एसएमएस मिळेल.

Web Title: ration card aadhar card linking online and offline till 30 june 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.