Join us

Ration Card Aadhar Card : सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 5:49 PM

Ration Card Aadhar Card : सरकारने रेशन कार्ड धारकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Ration Card Aadhar Card ( Marathi News ) : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. भारत सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे शिधापत्रिका आधारकार्डशी लिंक न केल्यास त्यांना रेशनचा लाभ मिळणार नाही. यामुळे आधार लिंक करणे महत्वाचे आहे, यासाठी सरकारने मुदत दिली होती. दरम्यान, आता मुदतवाढीबाबत सरकारकडून मोठी अपडेट आली आहे. केंद्राने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 

अदानीचे सात एअरपोर्ट वर्षभरात झाले मालामाल, आजवरचा मालवाहतुकीतील उच्चांक

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, आता रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. यापूर्वी त्याची अंतिम मुदत ३० जून होती. यापूर्वीही सरकारने अनेकवेळा मुदत वाढवून दिली आहे. आता पुन्हा एकदा मुदत वाढ दिली आहे. 

रेशन कार्ड आधारशी लिंक करावे लागणार का? भारत सरकारने वन नेशन-वन रेशनची घोषणा केली. यासाठी सरकारने शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिका लवकरात लवकर आधारशी लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेकांकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आहेत, हे थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकार देशातील सर्व बीपीएल कुटुंबांना शिधापत्रिकेद्वारे स्वस्त धान्य पुरवते.

रेशन कार्ड आधार कार्ड लिंक कसं करायचं?

ऑनलाईन रेशन कार्ड आधार कार्ड  लिंक करु शकता. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. आता येथे तुम्हाला आधार लिंकचा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर तुमचा रेशन कार्ड नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. आता तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर त्यात भरा आणि सबमिट हा पर्याय निवडा. यानंतर, फोनवर मिळालेला ओटीपी यात भरा आणि पुन्हा एकदा सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाईलवर आधार रेशनकार्डशी लिंक झाल्याचा एक मेसेज मिळेल.

टॅग्स :आधार कार्ड