नवी दिल्ली : रेशन कार्डच्या (Ration Card) माध्यमातूनच सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबीयांना रेशन पुरवते. परंतु बर्याच वेळा असे घडते की, डीलर्स किंवा रेशन दुकानदार हे रेशन कार्डधारकांना रेशन देण्यास नकार देतात किंवा कमी रेशन देतात. जर तुम्ही देखील अशा कोणत्याही समस्येमुळे त्रस्त असाल तर आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. (ration card holder complain on this helpline number if getting less quantity of ration)
अशा तक्रारींसाठी सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. जिथे तुम्ही तक्रार करू शकता आणि आपल्या समस्येचे त्वरित निराकरण करू शकता. विशेष म्हणजे, हे हेल्पलाइन नंबर वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे आहेत. याशिवाय तुम्ही रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव देखील जोडू शकता.
राज्य निहाय तक्रार हेल्पलाइन नंबर खालील प्रमाणे...आंध्र प्रदेश 1800 425 2977अरुणाचल प्रदेश 03602244290आसाम 1800 345 3611बिहार 1800 3456 194छत्तीसगड 1800 233 3663गोवा 1800 233 0022गुजरात 1800 233 5500हरयाणा 1800–180–2087हिमाचल प्रदेश 1800–180-8026झारखंड 1800 345 6598, 1800 212 5512कर्नाटक 1800 425 9339केरळ 1800 425 1550मध्य प्रदेश 181महाराष्ट्र 1800 22 4950मणिपूर 1800 345 3821मेघालय 1800 345 3670मिझोरम 1860 222 222 789, 1800 345 3891नागालँड 1800 345 3704, 1800 345 3705ओडिशा 1800 345 6724/6760पंजाब 1800 3006 1313राजस्थान 1800 180 6127सिक्किम 1800 345 3236तामिळनाडू 1800 425 5901तेलंगणा 1800 4250 0333त्रिपुरा 1800 345 3665उत्तर प्रदेश 1800 180 0150उत्तराखंड 1800 180 2000, 1800 180 4188पश्चिम बंगाल 1800 345 5505दिल्ली 1800 110 841जम्मू 1800 180 7106काश्मीर 1800–180-7011अंदमान आणि निकोबार बेटे 1800 343 3197चंदीगड 1800–180–2068दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 1800 233 4004लक्षद्वीप 1800 425 3186पुडुचेरी 1800 425 1082
या लिंकला भेट द्या...आपल्या राज्याचा टोल फ्री नंबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकवर भेट देऊन काढू शकता. याचबरोबर, अनेकदा असे दिसून येते की, रेशनकार्डसाठी अर्ज करूनही अनेकांना अनेक महिने रेशन कार्ड मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत, लोक याद्वारे सहजपणे त्याची तक्रार देखील करू शकतो.