Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ration Card: रेशन कार्डसंबंधी अनेक सेवा मिळतात ऑनलाइन, जाणून घ्या सविस्तर 

Ration Card: रेशन कार्डसंबंधी अनेक सेवा मिळतात ऑनलाइन, जाणून घ्या सविस्तर 

Ration Card: आता तुम्ही तुमच्या जवळच्या CSC अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे रेशन कार्डशी संबंधित अनेक सेवांचा अॅक्सेस करू शकता. डिजिटल इंडियाने एका ट्विटमध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 12:45 PM2021-09-18T12:45:27+5:302021-09-18T12:46:37+5:30

Ration Card: आता तुम्ही तुमच्या जवळच्या CSC अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे रेशन कार्डशी संबंधित अनेक सेवांचा अॅक्सेस करू शकता. डिजिटल इंडियाने एका ट्विटमध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

ration card latest news these services related to ration card are available online through csc center | Ration Card: रेशन कार्डसंबंधी अनेक सेवा मिळतात ऑनलाइन, जाणून घ्या सविस्तर 

Ration Card: रेशन कार्डसंबंधी अनेक सेवा मिळतात ऑनलाइन, जाणून घ्या सविस्तर 

नवी दिल्ली : गरीब आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी रेशन कार्ड सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. दरम्यान, बऱ्याचदा असे होते की, आपल्या रेशन कार्ड मध्ये काही उणीवा असतात किंवा रेशन कार्ड अपडेट करावे लागेल. तसेच, अनेक वेळा रेशन कार्ड हरवल्यास, त्याची डुप्लिकेट कॉपी बनवावी लागते किंवा नवीन रेशन कार्ड आवश्यक असते. (ration card latest news these services related to ration card are available online through csc center)

अशावेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आता या सर्व समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते. कारण सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत या समस्यांवर उपाय मिळाला आहे. आता तुम्ही तुमच्या जवळच्या CSC अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे रेशन कार्डशी संबंधित अनेक सेवांचा अॅक्सेस करू शकता. डिजिटल इंडियाने एका ट्विटमध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

डिजिटल इंडियाकडून माहिती
डिजिटल इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर ही माहिती दिली आहे की, 'कॉमन सर्व्हिस सेंटरने (सीएससी) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. यामुळे देशभरात 3.70 लाख सीएससीद्वारे रेशन कार्ड सेवा उपलब्ध करून दिली जाईल. या भागीदारीमुळे देशभरातील 23.64 कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड धारकांना फायदा होण्याची आशा आहे.'

याअंतर्गत, आता देशभरातील 23.64 कोटीहून अधिक रेशन कार्ड धारक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे रेशन कार्डच्या अनेक सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.


तुम्हाला 'या' महत्वाच्या सेवा मिळतील
1. रेशन कार्डचे तपशील कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अपडेट केले जाऊ शकतात.
2. आधार सीडिंग देखील येथून करता येते.
3. तुम्ही आपल्या रेशन कार्डची डुप्लिकेट प्रिंट देखील मिळवू शकता.
4.  तुम्ही रेशनच्या उपलब्धतेबद्दल देखील माहिती घेऊ शकता.
5.  तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे रेशन कार्डशी संबंधित तक्रारी देखील करू शकता.
6.  रेशन कार्ड हरवल्यास नवीन रेशन कार्डसाठी अर्जही करता येतो.

Web Title: ration card latest news these services related to ration card are available online through csc center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.