Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी! कुटुंबातील सदस्याचे नाव कमी करण्याची प्रक्रिया जाणून घ्या...

रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी! कुटुंबातील सदस्याचे नाव कमी करण्याची प्रक्रिया जाणून घ्या...

Ration Card Update : तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये नोंद करू शकता किंवा काढून टाकू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 03:59 PM2022-08-11T15:59:25+5:302022-08-11T15:59:50+5:30

Ration Card Update : तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये नोंद करू शकता किंवा काढून टाकू शकता.

ration card update how to remove someone name from ration card know details | रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी! कुटुंबातील सदस्याचे नाव कमी करण्याची प्रक्रिया जाणून घ्या...

रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी! कुटुंबातील सदस्याचे नाव कमी करण्याची प्रक्रिया जाणून घ्या...

नवी दिल्ली : रेशन कार्ड (Ration Card) हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, ज्याद्वारे देशातील करोडो लोकांना दरमहा मोफत रेशन मिळते. तुम्हीही रेशन कार्डधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला रेशनमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर तुम्ही ते सहज करू शकता. कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे रेशन कार्डमध्ये नोंदवली जातात. अशा परिस्थितीत आवश्यक असल्यास तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये नोंद करू शकता किंवा काढून टाकू शकता.

जेव्हा जेव्हा घरात मूल जन्माला येते किंवा कुटुंबात नवीन सून येते तेव्हा तिचे नाव रेशन कार्डवर नोंदवणे अत्यंत आवश्यक असते. याप्रमाणे, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत त्या कुटुंबातील सदस्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकणे देखील अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या शहरात बदली झाल्यास रेशनकार्डमधून नाव कमी करणे आवश्यक आहे. रेशन कार्डमधून नाव काढून टाकण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.  याबद्दल जाणून घेऊया...

या डॉक्युमेंट्सची आवश्यकता
- रेशन कार्डधारकाचे आधार कार्ड (Aadhaar Card)
- रेशन कार्डधारकाचा पासपोर्ट साइजचा फोटो (Passport Photo)
- मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate)
- कुटुंबातील सदस्याचे आधार कार्ड 

रेशन कार्ड कसे अपडेट करायचे?
- रेशन कार्डमधून कुटुंबातील सदस्याचे नाव काढून टाकण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या राज्याच्या रेशन वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
- त्यानंतर रेशन कार्ड अपडेट (Ration Card Update) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- कुटुंबातील सदस्याचे नाव कमी करण्याचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करावे लागेल.
- यानतंर मागितलेल्या डॉक्युमेंट्सची माहिती द्यावी लागेल.
- तुमच्या रेशन कार्डमधून त्या कुटुंबातील सदस्याचे नाव काढून टाकले जाईल.

Web Title: ration card update how to remove someone name from ration card know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.