गोदरेज कंझ्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रेमंडची डील सध्या GST अधिकारिऱ्याच्या रडारवर आहे. गोदरेज कंपनीने नुकतेच रेमंडचे कंझ्यूमर गुड्स खरेदी करण्यासाठी एक डील केली होती. हीच डील आता DGGI च्या कक्षेत आली आहे. माध्यमांतील माहितीनुसार, डायरेक्ट्रेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलीजन्स या डीलचा तपास करत आहे. गोदरेज कंझ्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने नुकताच रेमंडचा FMCG बिझनेस खरेदी केला आहे. यात पार्क एव्हेन्यू, केएस, कंडोम तयार करणारी कंपनी कामसूत्र आणि प्रीमियम ट्रेडमार्क्सचा समावेश आहे.
रेमंड कंझ्यूमर केयर लिमिटेडला DGGI ने नोटीस पाठवली आहे. यात, ट्रांझेक्शन अमाउंटवर जीएसटी का लावू नये? अशी विचारणा DGGI ने केली आहे. टीव्ही 9 भारत वर्षने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, DGGI च्या मुंबई युनिटने चौकशी दरम्यान मुंबईमध्ये रेमंडच्या काही ठिकाणांचे निरिक्षणही केले होते. CGST च्या कलम 67 अंतर्गत एखाद्या अधिकाऱ्याला टॅक्स अथवा त्यासंदर्भात माहिती लपवण्याचा संशय आला, तर ते अशा प्रकारचे इंस्पेक्शन करू शकतात.
यासंदर्भात कंपनीने DGGI ला उत्तर देताना तर्क दिला आहे की, ही स्लंप डील होती आणि यावर GST लागायला नको. तर, दुसऱ्या बाजूला GST विभागाचे म्हणणे आहे की, यावर 18 टक्के दराने GST गालायला हवा. तसेच, GST अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासासंदर्भात रेमंडच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, डीजीजीआयने या ट्रांझेक्शन प्रकरणी इंस्पेक्शन केले होते. हा शोध नव्हता. ज्याचे कंपनीने डॉक्युमेंट्री एव्हिडेंससह स्पष्टीकरण दिले आहे.