गेल्या काही दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली होती. यासारखीच आता आरबीआयने आयआयएफएल फायनान्सवर केंद्रीय बँकेने ही कठोर कारवाई केली आहे. आपल्या ग्राहकांना गोल्ड लोन देणे ताबडतोब बंद करण्यास सांगितले आहे.
आरबीआयने सोमवारी एक आदेश जारी करून बिगर बँकिंग फायनान्स कंपनी IIFL फायनान्सला नवीन गोल्ड लोन देण्यावर बंदी घातली आहे. आयआयएफएलच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये काही पर्यवेक्षी चिंतांमुळे रिझर्व्ह बँकेने हा निर्णय तपासानंतर दिला आहे. आता ही NBFC कंपनी आपल्या ग्राहकांना कोणतेही नवीन सोने कर्ज देऊ शकणार नाही.
₹७१ चा शेअर ₹२६० वर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी 'या' IPO कडून २६६% ची कमाई; गुंतवणूकदार मालामाल
आरबीआयने ३१ मार्च २०२३ पर्यंत आयआयएफएलच्या आर्थिक आरोग्याबाबत कंपनीची तपासणी केली होती आणि या कालावधीत कंपनीच्या कर्ज ते मूल्य प्रमाणमध्ये अनियमितता आढळून आली, यामुळे ग्राहकांच्या हितावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. किंवा इतर. मध्यवर्ती बँकेने IIFL च्या कामकाजाचे विशेष ऑडिट करण्याची तयारी केली आहे.
शेअरमध्ये मोठी घसरण
आरबीआयच्या या निर्णयामुळे आयआयएफएल फायनान्सच्या शेअरवर परिणाम दिसला आहे. कंपनीचे शेअर घसरल्याचे दिसत आहे. शेअर बाजार सुरू होताच कंपनीचे शेअर लोअर सर्किटवर आले आणि ते १९.९९ टक्क्यांनी घसरून ४७७.७५ रुपयांच्या पातळीवर गेले. पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईनंतर पेटीएमच्या मुळे कंपनीच्या One97 कम्युनिकेशनच्या शेअर्सवर दिसून आला. आरबीआयने आदेश जारी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेटीएमचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले होते.