Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm पेमेंट्स बँकेवर RBI'ची कारवाई! बँकिंग आणि वॉलेट सेवा देता येणार नाही; पैसे काढता येणार का?

Paytm पेमेंट्स बँकेवर RBI'ची कारवाई! बँकिंग आणि वॉलेट सेवा देता येणार नाही; पैसे काढता येणार का?

नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 05:44 PM2024-01-31T17:44:52+5:302024-01-31T17:47:54+5:30

नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

RBI action on Paytm Payments Bank banking and wallet services | Paytm पेमेंट्स बँकेवर RBI'ची कारवाई! बँकिंग आणि वॉलेट सेवा देता येणार नाही; पैसे काढता येणार का?

Paytm पेमेंट्स बँकेवर RBI'ची कारवाई! बँकिंग आणि वॉलेट सेवा देता येणार नाही; पैसे काढता येणार का?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी पेटीएमच्या बँकिंग सेवेवर मोठी कारवाई केली. RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला क्रेडिट व्यवहार आणि कोणत्याही प्रकारच्या ठेवी घेण्यास बंदी घातली आहे. पेटीएम २९ फेब्रुवारीनंतर पेटीएम बँकिंग सेवा देऊ शकणार नाही. नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. ग्राहक त्यांचे पैसे काढू शकतात, असंही आरबीआयने म्हटले आहे.

'२९ फेब्रुवारीनंतर, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला ग्राहकांच्या खात्यांमध्ये किंवा वॉलेट आणि फास्टॅग सारख्या प्रीपेड साधनांमध्ये ठेवी स्वीकारण्यास किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप करण्यास परवानगी देण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. ग्राहकांना त्यांच्या खात्यातील बचत आणि करंटसह शिल्लक रक्कम कोणत्याही निर्बंधाशिवाय आणि त्यांच्या विहित मर्यादेपर्यंत वापरता येईल, असंही यात म्हटले आहे.

Sensex ६१२ तर Nifty २०३ अंकांच्या तेजीसह बंद, पाहा कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले

पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ऑडिटमध्ये पर्यवेक्षकीय त्रुटी आढळून आल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. बँकिंग नियमन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. पेटीएम पेमेंट्स बँकेला १५ मार्चपर्यंत नोडल खाते सेटल करण्यास सांगितले आहे. नवीन ग्राहकांकडून ठेवी घेण्यावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: RBI action on Paytm Payments Bank banking and wallet services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.