Join us

अलर्ट! कोणालाही शेअर करू नका 'ही' माहिती; खातं रिकामं होण्याची भीती, RBI चा सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 2:23 PM

Reserve Bank of India : हल्ली वाढत असलेल्या डिजिटल फसवणुकीविरोधात लोकांना अलर्ट केलं आहे.

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) हल्ली वाढत असलेल्या डिजिटल फसवणुकीविरोधात लोकांना अलर्ट केलं आहे. आरबीआयने ग्राहकांना त्यांचा ओटीपी (OTP), क्रेडिट अथवा सीव्हीव्ही क्रमांक (CVV) आणि व्यवहारासाठी आवश्यक पिन क्रमांक (PIN) कोणालाही शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. आरबीआयने याविषयीची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. फसवणूक करणारी लोक असल्याने ग्राहकांनी अधिक सतर्कतेने व्यवहार करण्याची आवश्यकता असल्याचं स्पष्ट केलं आहे. जनहितार्थ प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेत रिझर्व्ह बँकेने फसवणुकीचे प्रकार, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी, त्यासाठी करण्यात आणि वापरण्यात येणाऱ्या युक्त्या यांची सविस्तर माहिती दिली आहे. .

केंद्रीय बँकेने फसवणुक प्रकरणांचा सखोल अभ्यास केल्यानंतर ही पुस्तिका ग्राहकांसाठी तयार केली आहे. व्यवहार करताना पुरेशी काळजी न घेतल्यास अथवा निष्काळजीपणे व्यवहार केल्यास अनेकदा ग्राहक जाळ्यात अडकतात. ग्राहकांनी त्यांचा ओटीपी, क्रेडिट अथवा डेबिट कार्डमागील तीन अंकी सीव्हीव्ही क्रमांक आणि व्यवहारासाठी आवश्यक पिन क्रमांक कोणालाही शेअर करू नये ( Don’t Share) असं आवाहन केलं आहे. तसेच याविषयीची माहिती नातेवाईक आणि मित्रांना देखील देवू नका असं म्हटलं आहे. 

फोन कॉल्स अथवा मॅसेजद्वारे दिशाभूल करुन ग्राहकांकडून त्यांचा पासवर्ड, ओटीपी, पिन, सीव्हीव्ही ही माहिती घेण्यात येते. आकर्षक योजना, आमिष दाखवून, दंड टाळण्यासाठी माहिती देत असल्याचे अथवा बँक कर्मचारी असल्याचे भासवून अथवा इतर अधिकारी बोलत असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात येते. ई-मेल्सवर अद्यात येणा-या लिंक्स, आकर्षक योजनांचे येणारे ई-मेल्स आणि त्यात विचारलेली माहिती डोळेझाकून भरल्यास तुम्हची आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नेहमीच सतर्क राहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक