मुंबई: एटीएम वापरकर्त्यांच्या खिशाला आता अधिक झळ बसणार आहे. दर महिन्याला मर्यादेपेक्षा अधिक वेळा एटीएमचा वापर केल्यास यापुढे अधिक शुल्क द्यावं लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ग्राहक शुल्क आणि बिगर बँक एटीएम शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे यापुढे बँकांनी घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेळा एटीएमचा वापर केल्यास ग्राहकांना जास्त शुल्क मोजावं लागेल.
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा टेन्शन होईल दूर, संधी मिळणार भरपूर
एटीएममधून होणाऱ्या व्यवहारांवर इंटरचेज शुल्क आकारलं जातं. याचा अर्थ तुम्ही तुमच्या बँकेच्या एटीएमऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास ठराविक शुल्क आकारण्यात येतं. दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ओलांडल्यास तुम्हाला अधिक शुल्क भरण्याची तयारी ठेवावी लागेल. १ ऑगस्ट २०२१ पासून शुल्क वाढ लागू होईल.
सरकारी बँका कर्मचाऱ्यांना देणार व्हीआरएस, खासगीकरणाची प्रक्रिया
आरबीआयनं ग्राहक शुल्कात वाढ केली आहे. आधी एका व्यवहारामागे २० रुपये आकारले जात होते. मात्र आता व्यवहारामागे २१ रुपये आकारले जातील. याचा अर्थ तुम्ही स्वत:च्या बँकेचं एटीएम वापरण्याची मर्यादा ओलांडल्यास तुम्हाला अधिक शुल्क मोजावं लागेल. कॅश रिसायकलर मशीनसाठीदेखील नवे शुल्क लागू होतील. हे शुल्क १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल.
आरबीआयनं सर्व बँकांच्या एटीएममधून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठीचं इंटरचेंज शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपये केलं आहे. याचप्रमाणे बिगर आर्थिक व्यवहारांसाठीचं शुल्क ५ रुपयांवरून ६ रुपयांवर नेण्यात आलं आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पैसे काढण्याचा समावेश होतो. तर बिगर आर्थिक व्यवहारांमध्ये बॅलेन्स पाहणं, पिन नंबर बदलणं अशा बाबी समाविष्ट आहेत.
एटीएम वापरकर्त्यांनो, आता खिशाला बसणार अधिक झळ; RBIकडून शुल्कात 'इतकी' वाढ
आरबीआयकडून शुल्कात वाढ; एटीएमचा मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्यास अधिक पैसे मोजावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:25 PM2021-06-11T12:25:20+5:302021-06-11T12:26:01+5:30