Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI ची मोठी घोषणा; 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार होणार?

RBI ची मोठी घोषणा; 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार होणार?

rbi : मागील वर्षी देखील आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या. आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 03:58 PM2021-05-28T15:58:23+5:302021-05-28T16:13:33+5:30

rbi : मागील वर्षी देखील आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या. आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.

rbi announces no fresh supply of rs 2000 currency notes in fy 21-22 | RBI ची मोठी घोषणा; 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार होणार?

RBI ची मोठी घोषणा; 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार होणार?

Highlights2021-2022 या आर्थिक वर्षात 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या जाणार नाहीत, अशी घोषणा आरबीआयने केली आहे.

नवी दिल्ली : देशाच्या चलन प्रणालीमधून लवकरच 2 हजारांच्या नोटा (2,000 currency notes) हद्दपार होण्याची शक्यता आहे. कारण, आता 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) हळूहळू चलन प्रणालीमधून 2 हजार रुपयांच्या नोटा काढण्यास सुरूवात केली आहे. 2021-2022 या आर्थिक वर्षात 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या जाणार नाहीत, अशी घोषणा आरबीआयने केली आहे. मागील वर्षी देखील आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या. आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. हा अहवाल 26 मे 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. (rbi announces no fresh supply of rs 2000 currency notes in fy 21-22)

नोटाबंदीनंतर 2 हजार रुपयांची नोट आणली
भारतात नोटाबंदी केल्यानंतर (Demonetization in India) 2016 मध्ये चलनात 2 हजार रुपयांची नोट आणली होती. परंतु मोठी मूल्यवान नोट असल्याने ही बनावट चलन बाजारात जाण्याचा धोकाही जास्त आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2021 मध्ये एकूण पेपर रोख 0.3 टक्क्यांनी घटून  2,23,301 लाख युनिट्सवर पोचली. मूल्याच्या दृष्टीने मार्च 2021 मध्ये 4.9 लाख कोटी रुपयांच्या 2 हजारच्या नोट चलन प्रणालीमध्ये होत्या, तर मार्च 2020 मध्ये त्याचे मूल्य 5.48 लाख कोटी रुपये होते.

3 वर्षांत 2 हजारच्या नोटा झाल्या कमी
आरबीआयच्या अहवालानुसार, मार्च 2018 मध्ये 2000 प्रणालीत 336.3 कोटीच्या नोटा होत्या, परंतु 31 मार्च 2021 मध्ये या संख्येत घट होऊन 245.1 कोटींवर आली आहे. म्हणजेच या तीन वर्षात 91.2 कोटी नोटांना चलन प्रणालीवरून बाहेर काढल्या गेल्या आहेत.

चलनात 500 रुपयांच्या नोटा अधिक
आरबीआयच्या या अहवालानुसार, 31 मार्च 2021 पर्यंत चलनात एकूण बँक नोटांमध्ये 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटांचा वाटा 85.7 टक्के होता. तर 31 मार्च 2020 अखेरपर्यंत हा आकडा 83.4 टक्के होता. यामध्येही प्रमाणानुसार, 31 मार्च 2021 पर्यंत चलनात असलेल्या नोटांमध्ये 500 रुपयांचा नोटांचा हिस्सा सर्वाधिक 31.1 टक्के होता.

Read in English

Web Title: rbi announces no fresh supply of rs 2000 currency notes in fy 21-22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.