Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध; ग्राहकांवर काय परिणाम होणार

RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध; ग्राहकांवर काय परिणाम होणार

देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. रिझर्व्ह बँकेने आता तात्काळ प्रभावाने एका बँकेच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 04:51 PM2023-01-24T16:51:50+5:302023-01-24T16:52:05+5:30

देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. रिझर्व्ह बँकेने आता तात्काळ प्रभावाने एका बँकेच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे.

RBI asks SBM Bank to stop transactions under remittance scheme what happened to customers | RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध; ग्राहकांवर काय परिणाम होणार

RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध; ग्राहकांवर काय परिणाम होणार

देशातील सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसह सर्वांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मार्गदर्शक तत्त्वे जारी करतात. तुम्हीही देशातील कोणत्याही बँकेत खाते उघडले असेल तर RBI चे नवीन नियम नक्की जाणून घ्या. रिझर्व्ह बँकेने आता तात्काळ प्रभावाने एका बँकेच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे, याचा अर्थ तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकणार नाही.

रिझर्व्ह बँकेने एसबीएम बँक (इंडिया) लिमिटेडवर लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस) अंतर्गत तात्काळ प्रभावाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काही आर्थिक चिंतांमुळे ही बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने म्हटले आहे की पुढील सूचनेपर्यंत ही बंदी लागू राहील. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A आणि 36(1)(a) अंतर्गत, रिझर्व्ह बँकेने SBM बँकेला LRS व्यवहार थांबवण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याचे बँकेने पालन करणे आवश्यक आहे. यासोबतच आरबीआयने एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे.

एक फायनॅन्शिअल सर्व्हिसेस ग्रुप
SBM बँक ही मॉरिशसस्थित SBM होल्डिंगची उपकंपनी आहे. एसबीएम ग्रुप हा एक वित्तीय सेवा समूह आहे जो ठेवी, कर्ज, व्यवसायासाठी वित्तपुरवठा आणि कार्ड्स यासह इतर सेवा प्रदान करतो.

3 कोटींचा लागलाय दंड
SBM बँकेने RBI कडून परवाना घेतल्यानंतर 1 डिसेंबर 2018 रोजी बँकिंग सुविधा सुरू केल्या. सध्या देशभरात त्यांच्या एकूण 11 शाखा आहेत. 2019 मध्ये नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल बँकेला 3 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

Web Title: RBI asks SBM Bank to stop transactions under remittance scheme what happened to customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.