Join us

पीएनबी घोटाळ्याचे कारण ठरलेल्या मुळावर आरबीआयचा घाव,  बँकांच्या एलओयू जारी करण्यावर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 8:21 PM

 बँकांकडून देण्यात येणाऱ्या लेटर ऑफ अंडरटेकिंगचा गैरफायदा घेऊन निरव मोदीने केलेला हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्र हादरले आहे. या घोटाळ्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून बँकांच्या एओयू म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करण्यावर बंदी घातली आहे.

मुंबई -  बँकांकडून देण्यात येणाऱ्या लेटर ऑफ अंडरटेकिंगचा गैरफायदा घेऊन निरव मोदीने केलेला हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्र हादरले आहे. या घोटाळ्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून बँकांच्या एओयू म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी आयात करण्यासाठी मिळवण्यात येणाऱ्या एलओयूवर घालण्यात आली आहे. आयातीच्या व्यापारासाठी बँकांच्या एलओयूचा वापर व्यापाऱ्यांकडून केला जातो. तर देशांतर्गत व्यापारासाठी लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे लेटर ऑफ क्रेडित वापरले जाते. मात्र पीएनबी घोटाळ्याचा प्रभाव लेटर ऑफ क्रेडिवरही पडला आहे. अहमदाबादसारख्या व्यापारी केंद्र असलेल्या शहरामध्ये विविध खाजगी बँकांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडूम जारी करण्यात आलेले लेटक ऑफ क्रेडिट घेण्यास नकार दिला आहे. बँकांच्या या धोरणामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपंजाब नॅशनल बँक घोटाळा