Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI Bomb Threat : नव्या गव्हर्नरांना रशियन भाषेत मेल; RBI ला उडवून देण्याची धमकी

RBI Bomb Threat : नव्या गव्हर्नरांना रशियन भाषेत मेल; RBI ला उडवून देण्याची धमकी

RBI bomb threat: मल्होत्रा यांनी काही दिवसांपूर्वीच आरबीआयचा पदभार स्वीकारला आहे. शक्तीकांत दास यांनी सहा वर्षे ही जबाबदारी सांभाळली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:33 IST2024-12-13T11:33:40+5:302024-12-13T11:33:52+5:30

RBI bomb threat: मल्होत्रा यांनी काही दिवसांपूर्वीच आरबीआयचा पदभार स्वीकारला आहे. शक्तीकांत दास यांनी सहा वर्षे ही जबाबदारी सांभाळली होती.

RBI bomb threat: Mail in Russian launguage to new governor; Threat to blow up RBI | RBI Bomb Threat : नव्या गव्हर्नरांना रशियन भाषेत मेल; RBI ला उडवून देण्याची धमकी

RBI Bomb Threat : नव्या गव्हर्नरांना रशियन भाषेत मेल; RBI ला उडवून देण्याची धमकी

आतापर्यंत दिल्ली, मुंबईतील शाळा, विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात येत होती. परंतू, आज या समाजकंटकांचे धाडस आरबीआयला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यापर्यंत वाढले आहे. नुकतेच गव्हर्नरपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या संजय मल्होत्रा यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर रशियन भाषेत धमकीचा मेल आला आहे. 

याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली असून भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्होत्रा यांनी काही दिवसांपूर्वीच आरबीआयचा पदभार स्वीकारला आहे. शक्तीकांत दास यांनी सहा वर्षे ही जबाबदारी सांभाळली होती. मल्होत्रा हे राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. 

आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर या धमकीचा मेल आला आहे. यामध्ये रशियन भाषेचा वापर करण्यात आला आहे. बँकेची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे मुंबई पोलीस झोन १ च्या डीसीपींनी सांगितले. 

गेल्या सहा महिन्यांपासून दिल्ली, मुंबईतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याचे ईमेल येत आहेत. गेल्या महिन्यात तर या समाजकंटकांनी विमानसेवेला लक्ष्य केले होते. यामुळे शेकडो फ्लाईट रद्द करण्यात आली होती. शाळा किंवा विमानाची तपासणी केली असता काहीही सापडत नाही. परंतू, जोखीम पत्करण्यास यंत्रणा तयार नाहीत. यामुळे शाळा बंद ठेवणे किंवा विमान माघारी बोलवून तपास करण्याची काळजी घेतली जाते. 

 

Web Title: RBI bomb threat: Mail in Russian launguage to new governor; Threat to blow up RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.