Join us

रिझर्व्ह बँक एकट्यानं महागाई नियंत्रणात आणू शकत नाही, RBIच्या माजी गव्हर्नरांचा मोदी सरकारला दे धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 7:14 PM

केंद्र सरकारनं महागाई नियंत्रणात आणण्याचं एक लक्ष्य दिलेलं आहे, त्याची व्याप्ती वाढायला हवी.

ठळक मुद्दे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी रिझर्व्ह बँक एकट्यानं महागाई नियंत्रणात आणू शकत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कारण पुरवठा मागणीसंदर्भात सरकारनं आवश्यक व्यवस्थापन करण्याची गरज आहे.'नवीन आर्थिक धोरणं आणि त्याचा अर्थ' या शीर्षकाखालील एका पत्रकावरील चर्चासत्रादरम्यान त्यांनी महागाई रोखण्यासाठी आरबीआयच्या मर्यादा अधोरेखित केल्या

नवी दिल्लीः रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी रिझर्व्ह बँक एकट्यानं महागाई नियंत्रणात आणू शकत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कारण पुरवठा मागणीसंदर्भात सरकारनं आवश्यक व्यवस्थापन करण्याची गरज आहे. 'नवीन आर्थिक धोरणं आणि त्याचा अर्थ' या शीर्षकाखालील एका पत्रकावरील चर्चासत्रादरम्यान त्यांनी महागाई रोखण्यासाठी आरबीआयच्या मर्यादा अधोरेखित केल्या आहेत.

केंद्र सरकारनं महागाई नियंत्रणात आणण्याचं एक लक्ष्य दिलेलं आहे, त्याची व्याप्ती वाढायला हवी. त्याच्या कालबद्ध कार्यक्रमासाठी एक वेळ मर्यादा असावी आणि ती फारच अल्प मुदतीची नसावी. महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी आर्थिक धोरणांवर काम केलं पाहिजे. त्यासाठी पुरवठा व्यवस्थापन आवश्यक असून, त्याची जबाबदारी सरकारकडे असावी. ते म्हणाले, महागाई नियंत्रणात आणण्याचं लक्ष्य देशात स्वीकारले गेले असले तरी या कल्पनेने अनेक शंका आणि चिंता वाढवल्या आहेत. आरबीआय कायद्यात सुधारणा केल्यानंतर चलनवाढीचे लक्ष्य लक्षात घेऊन धोरणात्मक दर ठरविणारी आर्थिक धोरण समिती स्थापन करण्याची व्यवस्थाही करण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती मतदानाच्या आधारे असे निर्णय घेत असते. महागाई नियंत्रणात आणण्यावर लक्ष्य केंद्रित करून वाढ आणि आर्थिक स्थिरतेसारख्या इतर मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :व्यवसायनरेंद्र मोदीभारतीय रिझर्व्ह बँक