नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लोकांना जुन्या नोटा खरेदी किंवा एक्सचेंजच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीविरोधात सावध केले आहे. जुन्या नोटा आणि नाणी खरेदीसाठी सध्या मोठ्या प्रमाणात बनावट ऑफर्स देण्यात येत आहेत. या ऑफरला बळी पडू नका असं आवाहन आता बँकेच्या वतीने करण्यात आलं आहे. काही लोक बँकेच्या नावाने फसवणूक करत आहेत. परंतु बँकेचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आणि कधीही कोणाकडून कोणतेही शुल्क किंवा कमिशन मागत नाही असं स्पष्टीकरण यावर आरबीआयकडून देण्यात आलं आहे.
वेगवेगळ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमांतून आरबीआयच्या नावाने सर्वसामान्यांची मोठी फसवणूक केली जात आहे. जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी आणि विक्रीशी संबंधित व्यवहारांमध्ये शुल्क किंवा कमिशनची मागणी करत आहेत. याला फसू नका असं आरबीआयने म्हटलं आहे. तसेच य़ाबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील माहिती दिली आहे. "रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही सदस्याला, कर्मचाऱ्याला किंवा कंपनीला किंवा संस्थेला अशा व्यवहारांसाठी अधिकार देण्यात आलेले नाहीत" असं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेने सामान्य लोकांना अशा बनावट आणि फसव्या ऑफरच्या जाळ्यात न अडकण्याचा सल्ला दिला आहे.
It has come to the notice of Reserve Bank of India that certain elements are fraudulently using name/logo of RBI, and seeking charges/commission/tax from public, in transactions related to buying and selling of old banknotes & coins through various online/ offline platforms: RBI pic.twitter.com/tUcpsylRcM
— ANI (@ANI) August 4, 2021
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी याआधी देखील आरबीआयने लोकांना वेळोवेळी अलर्ट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळेच आता देखील जुन्या नोटा आणि नाणी याबाबत दिल्या जाणाऱ्या ऑफर्सला बळी पडू नका असा सल्ला देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. विविध मार्गांचा वापर करून हॅकर्स युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अनेक जण ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या रीवामध्ये सिम व्हेरिफेकशनच्या नावाने एका डॉक्टरची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. फक्त 11 रुपयांच्या नावाने एका डॉक्टरच्या खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी तब्बल 6 लाखांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. हा भयंकर प्रकार लक्षात येताच डॉक्टरने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
— RBI Says (@RBIsays) August 4, 2021
बापरे! सिम व्हेरिफिकेशनसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 6 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा
एका डॉक्टरला सिम व्हेरिफिकेशनच्या नावाने तब्बल सहा लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर क्रिमिनल्सने रिटायर्ड डॉक्टर अंबिका प्रसाद द्विवेदी यांवर निशाणा साधून त्यांची मोठी फसवणूक केली आहे. 18 जुलै रोजी फ्रॉड करणाऱ्यांनी डॉक्टरांना कॉल करुन त्यांचं सिम कार्ड व्हेरिफाय करण्याबाबत माहिती दिली. सिम कार्ड व्हेरिफाय न केल्यास, 24 तासांच्या आतमध्ये सिम बंद होणार असल्याची खोटी माहिती त्यांना दिली. तसेच सिम व्हेरिफिकेशनच्या नावाखाली 11 रुपये नेट बँकिंगद्वारे मागितले. डॉक्टरांनी जाळ्यात अडकून आपल्या SBI खात्यातून 11 रुपये ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्याच्या काही वेळातच डॉक्टरांच्या मोबाईलवर एका मागोमाग एक पैसे कट झाल्याचे 15 मेसेज आले. या मेसेजमधून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 6 लाख 423 रुपये उडाल्याचं समजलं.
धक्कादायक! सिम व्हेरिफिकेशनच्या नावाने डॉक्टरची मोठी फसवणूक; वेळीच व्हा सावध#crime#crimesnews#Policehttps://t.co/t22M63JQUO
— Lokmat (@MiLOKMAT) August 3, 2021
JOB Alert : खूशखबर! 34,000 रुपये पगार मिळणार; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?#JobAlert#bank#IDBIBankRecruitment2021https://t.co/WNsaYbUz6V
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2021