नवी दिल्ली : येणाऱ्या नवीन वर्षात तुम्ही नवीन पद्धतीने पेमेंट (Payment way) करू शकणार आहात. दरम्यान, 1 जानेवारी 2022 पासून, कार्ड पेमेंट (Card payment) करण्याची पद्धत बदलणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) पेमेंटशी संबंधित टोकनायझेशनचे नियम (RBI tokenization rules)जारी केले आहेत. म्हणजेच आता पेमेंटसाठी टोकन प्रणाली लागू केली जाणार आहे. (rbi change tokenisation rule to all consumer devices from 1 january 2022 check details)
दरम्यान, आरबीआयने डेटा स्टोरेजशी संबंधित टोकनसाठी नियम जारी केले आहेत. 1 जानेवारी 2022 पासून कार्ड जारी करणारी बँक किंवा कार्ड नेटवर्क शिवाय कोणीही वास्तविक कार्ड डेटा स्टोरेज करणार नाही. यामध्ये कार्डधारकाच्या डेटाच्या गोपनीयतेवर विशेष तरतूद करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल
आरबीआयच्या टोकनायझेशनच्या नवीन पेमेंट नवीन नियमांनुसार, पेंमेट एग्रीगेटर, व्यापाऱ्यांना डिसेंबर 2021 नंतर ग्राहक कार्ड डेटा गोळा करण्याची परवानगी नसणार आहे. तसेच टोकन प्रणाली अंतर्गत प्रत्येक व्यवहारासाठी कार्ड विवरण इनपुट करण्याची आवश्यकता राहणार नाही. दरम्यान, टोकन व्यवस्था ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल. ते घेण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव आणता येणार नाही. या व्यतिरिक्त, कोणत्याही बँक किंवा कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांकडून याची सक्ती केली जाणार नाही.
येथेही लागू होतील हे नियम
टोकनची ही व्यवस्था मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि स्मार्ट वॉचसह पेमेंटवर देखील लागू होईल. ही सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे जारी केले जातील. टोकनच्या स्वरूपात कार्ड डेटा जारी करण्याची सुविधा सुद्धा एकाच टोकन सर्व्हिस प्रोव्हायडरसोबत असेल. तथापि, ते ग्राहकांच्या संमतीवर अवलंबून असेल.
सध्या काय आहे, पेमेंट सिस्टम?
1 जानेवारी 2022 पासून, तुम्हाला तुमच्या कार्डची माहिती कोणत्याही थर्ड पार्टी अॅपसोबत शेअर करावी लागणार नाही. सध्या. जर तुम्ही झोमॅटोमधून अन्न मागवले किंवा ओला बुक केले, तर तुम्हाला कार्डची माहिती द्यावे लागते आणि याठिकाणी ग्राहकाच्या कार्डची संपूर्ण माहिती सेव्ह केली जाते. त्यामुळे फसवणुकीचा धोका असतो. मात्र, टोकनायझेशन प्रणालीद्वारे हे होणार नाही.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. #epfo#pf https://t.co/XtJbVnq9eL
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2021