Join us

परकीय चलनाच्या साठ्यात वाढ, 5.73 अब्जाने वाढून $ 622.46 अब्जावर पोहोचला फॉरेक्स रिझर्व्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 8:05 PM

भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे.

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात (Foreign Currency Reserves) मोठी वाढ झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) डेटा जारी केला आणि सांगितले की, 2 फेब्रुवारी 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा $ 5.73 अब्जने वाढून $ 622.46 बिलियनवर पोहोचला आहे.

RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 रोजी परकीय चलनाच्या साठ्याचा डेटा जारी केला. या आकडेवारीनुसार, 2 फेब्रुवारी रोजी परकीय चलन साठा 5.736 अब्ज डॉलरने वाढून 622.469 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, जो मागील आठवड्यात 616.733 अब्ज डॉलर होता. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, या काळात विदेशी चलन संपत्तीत ((Foreign Currency Asset) जोरदार वाढ झाली. परकीय चलन संपत्ती 5.186 अब्ज डॉलरने वाढून 551.133 अब्ज डॉलर झाली आहे. 

दरम्यान, आरबीआयच्या सोन्याच्या साठ्यातही मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा साठा $608 मिलियनने वाढून $48.08 अब्ज झाला आहे. पण, SDR मध्ये घट झाली असून, हा $18.18 बिलियनवर आला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये जमा केलेल्या साठ्यात कोणताही बदल झालेला नसून, तो $4.86 अब्जच्या पातळीवर कायम आहे.

टॅग्स :भारतअर्थव्यवस्थागुंतवणूककेंद्र सरकारएसबीआयभारतीय रिझर्व्ह बँक