नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदासह ९ व्यावसायिक बँकांनी बँकांतील किंग फिशर एअरलाईन्सच्या खात्यात दोन बँकांच्या झालेल्या फसवणुकीची माहिती उशिरा दिल्यासह अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला गेला आहे.
फसवणुकीची माहिती विलंबाने दिल्याबद्दल आम्हाला दंड ठोठावला गेला असल्याचे या नऊ बँकांनी स्वतंत्रपणे म्हटले आहे. पंजाब नॅशनल बँकेला तिने किंग फिशर एअरलाईन्सच्या खात्यातील फसवणुकीची माहिती उशिरा दिल्याबद्दल ५० लाख रुपये दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेचा आदेश मिळाल्यापासून १४ दिवसांत हा दंड भरायचा आहे.
कुणाला किती दंड?
युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँकेला प्रत्येकी 01कोटी रुपये
स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आणि फेडरल बँकेला प्रत्येकी 50 लाख रुपये
आरबीआयने स्टेट बँकेसह नऊ बँकांना ठोठावला दंड
फसवणुकीची माहिती उशिरा दिल्यासह अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 02:41 AM2019-08-05T02:41:30+5:302019-08-05T06:49:59+5:30