Join us

PMC बँकेला नवसंजीवनी मिळणार!; RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 10:37 PM

PMC बँकेबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देपीएमसी बँकेच्या लाखो खातेदारांना दिलासा मिळणारPMC बँकेबाबत RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई: आर्थिक घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या पंजाब अँण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत (PMC) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे खातेदारांची चिंता मिटणार असल्याचे सांगितले जात आहे. रिझर्व्ह बँकेने सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस या स्मॉल फायनान्स बँकेला पीएमसी बॅंकचे अधिग्रहण करण्यास परवानगी दिली. यामुळे पीएमसी बँकेच्या लाखो खातेदारांना दिलासा मिळणार आहे. (rbi gives approval to centrum financial services to take over pmc bank)

खासगी बँकिंग क्षेत्रात लघु वित्त संस्थाना प्रोत्साहन देणाऱ्या नव्या नियमावलीचा आधार घेत रिझर्व्ह बँकेने सेंट्रम फायनान्शिअलच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती दिली आहे. पीएमसी बँकेतील हिस्सा खरेदी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रस्ताव मागवले होते. यासंदर्भातील प्रक्रिया गेल्या डिसेंबर महिन्यात पार पडली होती. 

इंधनदरवाढीवर नितीन गडकरींनी सूचवला भन्नाट उपाय; लीटरमागे २० रुपयांची बचत शक्य!

सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडला मान्यता

पीएमसी बँकेतील हिस्सा खरेदी करण्यासाठी चार गुंतवणूकदारांनी तयारी दर्शवली होती. यापैकी सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड या स्माल फायनान्स बँकेने दिलेल्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेकडून तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सेंट्रम फायनान्शिअल लवकरच पीएमसी बँकेच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु करणार आहे. पीएमसी बँकेकडे ३५१८.८९ कोटी बुडीत कर्जे आहेत.

संकटात संधी! घरबसल्या झाले १ लाखाचे १० लाख; ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांचा भरघोस नफा

रिझर्व्ह बँकेने घातल्या होत्या मर्यादा

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील एचडीआयएल या कंपनीला ६५०० कोटींचे बेकायदा कर्ज दिल्याप्रकरणी पीएमसी बँक वादात सापडली होती. पीएमसी बँकेच्या बुडीत कर्जांप्रकरणी रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करून सप्टेंबर २०१९ मध्ये ग्राहकांच्या पैसे काढण्यावर बंदी घातली होती. यानंतर २० जून २०२० रोजी रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांना रोख रक्कम काढण्याची मर्यादा ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत वाढवली होती. त्यानंतर निर्बंधांची मर्यादा टप्याटप्यात वाढवून २२ डिसेंबर २०२०पर्यंत करण्यात आली होती.

दरम्यान, पंजाब अँण्ड महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) जवळपास १०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. तर, दुसरीकडे ३१ मार्च २०२० अखेर पीएमसी बँकेकडे १०७२७.१२ कोटींच्या ठेवी असून, बँकेने ४४७२.७८ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.  

टॅग्स :पीएमसी बँकभारतीय रिझर्व्ह बँकव्यवसाय