Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझर्व्ह बँक ५२ हजार कोटींचा नफा सरकारला देणार

रिझर्व्ह बँक ५२ हजार कोटींचा नफा सरकारला देणार

भारतीय रिझर्व्ह बँक ५२,६७९ कोटी रुपयांचा अधिकचा नफा केंद्र सरकारला हस्तांतरित करणार आहे

By admin | Published: August 12, 2014 03:21 AM2014-08-12T03:21:20+5:302014-08-12T03:21:20+5:30

भारतीय रिझर्व्ह बँक ५२,६७९ कोटी रुपयांचा अधिकचा नफा केंद्र सरकारला हस्तांतरित करणार आहे

RBI gives profit of Rs 52,000 crore to the government | रिझर्व्ह बँक ५२ हजार कोटींचा नफा सरकारला देणार

रिझर्व्ह बँक ५२ हजार कोटींचा नफा सरकारला देणार

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक ५२,६७९ कोटी रुपयांचा अधिकचा नफा केंद्र सरकारला हस्तांतरित करणार आहे. गेल्या वर्षी सरकारला दिलेल्या रकमेच्या तुलनेत हा नफा ६० टक्क्यांनी अधिक आहे. रिझर्व्ह बँकेने सोमवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबतची माहिती दिली.
आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, जून २०१४ मध्ये संपलेल्या वर्षात बँकेकडे ५२६.७९ अब्ज डॉलरचा अधिकचा नफा जमला. ही रक्कम सरकारला हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाने मंजुरी दिली. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने सरकारला एकूण ३३,०१० कोटी रुपयांचा अधिकचा नफा हस्तांतरित केला होता.
चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या ४.१ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी उपाययोजना करण्यास या मदतीचा फायदा होईल. गेल्या वर्षी वित्तीय तूट एकूण जीडीपीच्या ४.५ टक्के होती.
उल्लेखनीय म्हणजे जुलै ते जून या काळात रिझर्व्ह बँकेचे आर्थिक वर्ष गणले जाते. (प्रतिनिधी)

Web Title: RBI gives profit of Rs 52,000 crore to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.