Join us

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा पगार आपल्याला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 3:13 PM

मायकल पात्रा यांची आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली : भारतीय चलनातील नोटांवर हस्ताक्षर करणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) गव्हर्नरांचा महिन्याचा पगार तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसेल तर तुमच्या माहितीसाठी त्यांना प्रत्येक महिन्याला जवळपास 2.87 लाख रुपये इतका महिन्याचा पगार मिळतो. सध्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना या पगारात महागाई भत्त्यांसह इतर काही पेमेंटचा समावेश आहे. 

मायकल पात्रा यांची आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. विरल आचार्य यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिकामी होते. मायकल पात्रा पुढील तीन वर्षांपर्यंत आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम पाहणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आरबीआयचे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांच्यातील एकूण पगारात जास्त फरक नसतो. आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरच्या तुलनेत गव्हर्नरला एकूण 31,500 रुपये जास्त पगार मिळतो. 

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा

आपल्या माहितीसाठी, आरबीआयच्या गव्हर्नरशिवाय आणखी चार डेप्युटी गव्हर्नर असतात. मायकल पात्रा यांच्या नियुक्तीनंतर आता एन. एस. विश्वनाथन, बी. पी. कानुगो आणि एम. के. जैन यांच्यासह एकूण चार आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. एन. एस. विश्वनाथन यांना केंद्र सरकारने एक वर्षांचा कार्यकाळ वाढवून दिला आहे. या सर्वांचा पगार एकसारखाच असतो. यांना दर महिन्याला 2.55 लाख इतका पगार मिळतो. 

विशेष म्हणजे, आरबीआय गव्हर्नर यांच्यापेक्षा देशातील मोठ्या खासगी बँकांमधील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पगार जास्त असल्याचे पाहायला मिळते. 

महत्त्वाच्या बातम्या 

Nirbhaya Case : फाशी निश्चित! क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा! उदयनराजेंचा खोचक सल्ला

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात

दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा, योगगुरू रामदेव बाबांचा सल्ला

ड्रोन वापरता? 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; अन्यथा...

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकव्यवसाय