Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI, ICICI, HDFC, PNB'च्या ग्राहकांसाठी RBI ची मोठी घोषणा! खातेधारकांना होणार फायदा

SBI, ICICI, HDFC, PNB'च्या ग्राहकांसाठी RBI ची मोठी घोषणा! खातेधारकांना होणार फायदा

भारताची आर्थिक व्यवस्था अमेरिका आणि स्वित्झर्लंडपासून पूर्णपणे अलिप्त आहे, असंही शक्तिकांता दास म्हणाले .

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 02:13 PM2023-04-14T14:13:21+5:302023-04-14T14:14:53+5:30

भारताची आर्थिक व्यवस्था अमेरिका आणि स्वित्झर्लंडपासून पूर्णपणे अलिप्त आहे, असंही शक्तिकांता दास म्हणाले .

rbi governor says indian banking financial systems remain insulated from us switzerland | SBI, ICICI, HDFC, PNB'च्या ग्राहकांसाठी RBI ची मोठी घोषणा! खातेधारकांना होणार फायदा

SBI, ICICI, HDFC, PNB'च्या ग्राहकांसाठी RBI ची मोठी घोषणा! खातेधारकांना होणार फायदा

गेल्या काही दिवसापूर्वी अमेरिका आणि स्विझरलँडमधील बँका बुडाल्याची बातमी समोर आली होती. यामुळे भारतीय बँकांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी खातेधारकांना दिलासा दिला आहे. दास यांनी देशाच्या आर्थिक व्यवस्थेबाबत सकारात्मक विधान केले आहे. 'भारताची आर्थिक व्यवस्था अमेरिका आणि स्वित्झर्लंडपासून पूर्णपणे अलिप्त आहे. बँकिंग व्यवस्थेवर त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही. देशाची बँकिंग व्यवस्था लढाऊ, स्थिर आणि सुदृढ आहे, असंही दास म्हणाले. 

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार खुशखबर! पगार वाढीबाबत मोठी अपडेट

दास म्हणाले की, जागतिक स्तरावर अमेरिका आणि स्वित्झर्लंडच्या बँकिंग व्यवस्थेतील घडामोडींनी बँकिंग क्षेत्राच्या आर्थिक स्थैर्याचे आणि स्थिरतेचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह RBI गव्हर्नर उपस्थित आहेत. SBI, HDFC, ICICI आणि PNB बँक या देशातील सर्वात मोठ्या बँका आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार या चार बँकांवरच आहे. देशातील सुमारे ८० टक्के लोकांची बँक खाती या बँकांमध्ये आहेत. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या अपयशाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "ज्यापर्यंत भारताचा संबंध आहे, भारतीय बँकिंग प्रणाली, भारताची आर्थिक व्यवस्था, ती यूएस किंवा स्वित्झर्लंडमधील कोणत्याही घडामोडींपासून पूर्णपणे अस्पर्शित आहे." . आमची बँकिंग व्यवस्था लढाऊ, स्थिर आणि सुदृढ आहे.

'बँकिंगशी संबंधित पॅरामीटर्स, भांडवल पर्याप्तता, तणावग्रस्त मालमत्तेची टक्केवारी, बँकांचे निव्वळ व्याज मार्जिन, बँकांची नफा, यापैकी कोणतेही पॅरामीटर पाहिले तर भारताची बँकिंग सुदृढ आहे. आरबीआयचा संबंध आहे, गेल्या काही वर्षांत, मध्यवर्ती बँकेने नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांसह संपूर्ण बँकिंग प्रणालीचे पर्यवेक्षण आणि नियमन सुधारले आहे आणि कडक केले आहे, असंही दास म्हणाले. 

Web Title: rbi governor says indian banking financial systems remain insulated from us switzerland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.