लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्याच्या भू-राजकीय घडामोडींवर बँकांनी लक्ष ठेवत आपल्या खतावणीवरील संभाव्य परिणाम कमी करावेत. यासाठी अधिकाधिक भांडवल गोळा करण्यासह आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.
दास यांनी मंगळवार आणि बुधवारी देशातील प्रमुख बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यासोबत बैठका घेतल्या. दास यांनी यावेळी महामारीत अर्थव्यवस्था सुधारणेसाठी बँकांनी बजावलेल्या “महत्त्वाच्या भूमिकेचा” उल्लेख करत कौतुक केले.