Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनी लाँड्रिंग विरोधात आरबीआय मैदानात

मनी लाँड्रिंग विरोधात आरबीआय मैदानात

मनी लाँड्रिंग आणि अन्य बँकिंग नियमांचा भंग केल्याच्या प्रकरणावर आळा बसविण्यासाठी बँकांच्या तपासणी अहवालाचे काही भाग केंद्रीय

By admin | Published: January 5, 2016 11:37 PM2016-01-05T23:37:02+5:302016-01-05T23:37:02+5:30

मनी लाँड्रिंग आणि अन्य बँकिंग नियमांचा भंग केल्याच्या प्रकरणावर आळा बसविण्यासाठी बँकांच्या तपासणी अहवालाचे काही भाग केंद्रीय

RBI on the grounds of money laundering | मनी लाँड्रिंग विरोधात आरबीआय मैदानात

मनी लाँड्रिंग विरोधात आरबीआय मैदानात

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग आणि अन्य बँकिंग नियमांचा भंग केल्याच्या प्रकरणावर आळा बसविण्यासाठी बँकांच्या तपासणी अहवालाचे काही भाग केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागाला सोपविण्यास रिझर्व्ह बँक राजी झाली आहे.
याबाबत रिझर्व्ह बँकेवर सरकारचे प्रचंड दडपण होते. या दडपणाखाली बँक झुकली आहे. आर्थिक घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या अर्थमंत्रालयातील ‘सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरो’शी रिझर्व्ह बँक लवकरच समझोता करण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोच्या बैठकीत याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करूनही कायदेशीर अडचणी असल्याचे कारण दर्शवून रिझर्व्ह बँक आतापर्यंत अशी माहिती देत नव्हती. त्यामुळे हे प्रकरण विधिमंत्रालयाकडे सोपविण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: RBI on the grounds of money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.