Join us

RBI चा दणका! ‘या’ दोन बँकांवर मोठी कारवाई; ६ कोटींचा दंड; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 13:42 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेची नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांविरोधात आक्रमक भूमिकादोन्ही बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कारणे दाखवा नोटीससार्वजनिक क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या बँकांना दंड

मुंबई:भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, मोठी कारवाई करत दोन बँकांना कोट्यवधीचा दंड ठोठावला आहे. यापूर्वी खासगी क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या एचडीएफसी बँकेला मोठा दंड केल्यानंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांना रिझर्व्ह बँकेने दंड केला आहे. (rbi imposed monetary Rs 6 cr penalty on bank of india and punjab national bank)

रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेला दंड ठोठावला आहे. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांची माहिती देण्याच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी केले आहे. 

पेट्रोल पाठोपाठ डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर; ‘या’ राज्यात सर्वाधिक दर

दोन्ही बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कारणे दाखवा नोटीस

बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेला या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ इंडियाला चार कोटी, तर पंजाब नॅशनल बँकेला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पै पैसा: योग्य आर्थिक सल्लागार कसा निवडाल?

काही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले

बँक ऑफ इंडियाच्या ३१ मार्च २०१९ च्या आर्थिक ताळेबंदाची तपासणी केली असता त्यात काही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. याचा बँकांचे आढवा घेतला. तसेच १ जानेवारी २०१९ रोजी फ्रॉड मॉनिटरिंग रिपोर्ट सादर केला. मात्र त्यात फसवणुकीच्या घटनांची उशिरा नोंद घेणे, रिझर्व्ह बँकेने उशिरा कळवणे अशा प्रकारच्या अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. याच पद्धतीने पंजाब नॅशनल बँकेच्या आर्थिक ताळेबंदीची तपासणी करण्यात आली. पंजाब नॅशनल बँकेच्या ३१ मार्च २०१८ आणि ३१ मार्च २०१९ या कालावधीतील ताळेबंदाची तपासणी केली. त्यात जोखीम व्यवस्थापनातील त्रुटी , फ्रॉडची माहिती देण्यास झालेला उशीर, डेटा सुरक्षा यासारखी कारणे समोर आली, असे रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक ऑफ इंडियापंजाब नॅशनल बँकव्यवसाय