Join us  

RBI कडून बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर मोठी कारवाई, खातेधारकांना काढता येणार नाही 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 9:31 AM

RBI imposes : आरबीआयने म्हटले आहे की, हे निर्बंध लागू झाल्यानंतर बँक 8 नोव्हेंबर 2021 चे कामकाज संपल्यानंतर कोणतेही नवीन लोन जारी करू शकणार नाही.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) सोमवारी महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने राज्यातील यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर (Babaji Date Mahila Sahakari Bank) व्यवसाय निर्बंध लादले आहेत. याशिवाय, या बँकेतील खातेधारकांना 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावरही (5,000 withdrawal limit) बंदी घालण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आरबीआय सहकारी बँकांविरोधात कठोर धोरण अवलंबत आहे. त्याअंतर्गतच बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, हे निर्बंध लागू झाल्यानंतर बँक 8 नोव्हेंबर 2021 चे कामकाज संपल्यानंतर कोणतेही नवीन लोन जारी करू शकणार नाही. तसेच, या बँकेला आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणत्याही ठेवी स्विकारता येणार नाही. याशिवाय, या बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून 5000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

काय म्हटले आहे आरबीआयने जाणून घ्या?आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, "बँकेची लिक्विडिटी स्थिती पाहता सर्व बचत खाते, चालू खाते किंवा कोणत्याही इतर खात्यातून ठेवीदारांना 5000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही. मात्र ज्या ग्राहकांच्या खात्यातून कर्जाचा हप्ता कापला गेला आहे, त्यांना अटींच्या अधीन राहूनच सेटलमेंट करण्याची परवानगी दिली जाऊ शकते." याचबरोबर, या निर्बंधांकडे बँकिंग परवाना रद्द केला जात आहे, अशा दृष्टीने पाहिले जाऊ नये, असे आरबीआयने म्हटले आहे. तसेच, बँकेचे आर्थिक आरोग्य सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील. आरबीआय परिस्थितीनुसार वेळोवेळी या सूचनांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करू शकते, असेही म्हटले आहे.

बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंधबाबाजी दाते महिला सहकारी बँकेवरील हे निर्बंध 8 नोव्हेंबर 2021 रोजी कामकाज बंद झाल्यापासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू होतील, असे आरबीआयने म्हटले आहे. दरम्यान, काही सूचनांचे पालन न केल्यामुळे सुमारे दोन आठवड्यांपूर्वी आरबीआयने महाराष्ट्रातील वसई विकास सहकारी बँकेला 90 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच, आरबीआयने मुंबईतील अपना सहकारी बँकेला 79 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

टॅग्स :बँकयवतमाळभारतीय रिझर्व्ह बँकव्यवसाय