Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI ची मोठी कारवाई, सारस्वत बँकेसह 'या' बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI ची मोठी कारवाई, सारस्वत बँकेसह 'या' बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI Imposes Penalty : बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या तरतुदी आणि आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईतील सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 23 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 09:25 AM2023-09-29T09:25:22+5:302023-09-29T10:07:33+5:30

RBI Imposes Penalty : बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या तरतुदी आणि आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईतील सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 23 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

rbi imposes penalty on saraswat co operative bank, bassein catholic co operative bank, rajkot nagarik sahakari bank | RBI ची मोठी कारवाई, सारस्वत बँकेसह 'या' बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI ची मोठी कारवाई, सारस्वत बँकेसह 'या' बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली : नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) वेळोवेळी बँकांवर दंड आकारला जातो. अलीकडेच, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या एसबीआय (SBI) आणि इंडियन बँकेला (Indian Bank) कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर आता आरबीआयने तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. यामध्ये आरबीआयने सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Saraswat Co-operative Bank Limited), बसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Bassein Catholic Co-operative Bank Ltd) आणि राजकोट नागरिक सहकारी बँक लिमिटेड (Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd.) यांना दंड ठोठावला आहे.

बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या तरतुदी आणि आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईतील सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 23 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. आरबीआयकडून सांगण्यात आले की, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने बीआर कायद्यातील तरतुदी आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. तसेच, जेव्हा कर्ज घेणाऱ्या कंपनीला मंजूर केलेल्या क्रेडिट सुविधेचे नूतनीकरण झाले, तेव्हा बँकेचे संचालक कर्ज घेणाऱ्या कंपनीत स्वतंत्र संचालक पदावर होते.

याशिवाय, कलम 20 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल वसई येथील बसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 25 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. बसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक आपल्या एका संचालक/ त्याचा मालकीच्या फर्मला अनेक असुरक्षित कर्जे दिल्याबद्दल दोषी आढळली. याचबरोबर, राजकोट नागरिक सहकारी बँक लिमिटेडला 'ठेवीवरील व्याज दर' यासंदर्भात आरबीआयने जारी केलेल्या सूचनांचे पालन केले नसल्यामुळे 13 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. तसेच, आरबीआयने म्हटले आहे की, राजकोट नागरिक सहकारी बँक रविवारी/सुट्टीच्या दिवशी किंवा व्यवसाय नसलेल्या कामाच्या दिवशी एफडी मॅच्युअर झाल्यावर परतफेडीच्यावेळी व्याज देऊ शकत नव्हती.

गेल्या चार दिवसांपूर्वीच आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियासह (SBI) इंडियन बँक (Indian Bank) आणि पंजाब अॅण्ड सिंध बँकेचा समावेश आहे. एसबीआय आणि इंडियन बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांवर दंड ठोठावला आहे. आरबीआयने सांगितले की, एसबीआयला 1.3 कोटी रुपये, इंडियन बँकेला 1.62  कोटी रुपये आणि पंजाब अँड सिंध बँकेला 1 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, आरबीआयकडून वेळोवेळी नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी बँकांवर दंड आकारला जातो. मात्र त्याचा बँक खातेदारांवर कोणताही परिणाम होत नाही. तसेच, बँक खातेदारांच्या रोख रक्कम काढण्यावर किंवा जमा करण्यावर कोणतेही निर्बंध लादत नाही. त्यामुळे त्याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. 
 

Web Title: rbi imposes penalty on saraswat co operative bank, bassein catholic co operative bank, rajkot nagarik sahakari bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.