Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन बँकांवर RBI ची मोठी कारवाई! ग्राहकांना मर्यादित स्वरुपातच पैसे काढता येणार

दोन बँकांवर RBI ची मोठी कारवाई! ग्राहकांना मर्यादित स्वरुपातच पैसे काढता येणार

बँकिंग नियमांचं योग्य पद्धतीनं पालन न केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) दोन बँकांवर कारवाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 06:12 PM2022-07-29T18:12:14+5:302022-07-29T18:12:48+5:30

बँकिंग नियमांचं योग्य पद्धतीनं पालन न केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) दोन बँकांवर कारवाई केली आहे.

rbi imposes restrictions on lucknow urban co operative bank and one another limits withdrawal | दोन बँकांवर RBI ची मोठी कारवाई! ग्राहकांना मर्यादित स्वरुपातच पैसे काढता येणार

दोन बँकांवर RBI ची मोठी कारवाई! ग्राहकांना मर्यादित स्वरुपातच पैसे काढता येणार

नवी दिल्ली-

बँकिंग नियमांचं योग्य पद्धतीनं पालन न केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) दोन बँकांवर कारवाई केली आहे. यात बँकेनं दोन सहकारी बँकांवर निर्बंध घालत उत्तर प्रदेशातील लखनौ अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक (Lucknow Urban Co-operative Bank) आणि अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, सीतापूर (Urban Co-operative Bank Limited, Sitapur) वर कारवाई केली आहे. 

आरबीआयनं गुरुवारी दोन वेगवेगळी पत्रकं काढत लखनौ अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक आणि अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक, सीतापूर या दोन्ही सहकारी बँकांची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचा ठपका ठेवला आहे. यामुळे दोन्ही बँकांवर निर्बंध लादण्यात येत असल्याचं आरबीआयनं नमूद केलं आहे. त्यामुळे या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना पैसे काढण्यावर बंधनं आली आहेत. 

रिझर्व्ह बँकेनं दोन्ही सहकारी बँकांवर बँकिंग रेग्युलेशन अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील सहा महिने या बँकांच्या ग्राहकांना पैसे काढण्यावर काही निर्बंध असतील. सहा महिने उलटल्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती पाहून रिझर्व्ह बँक पुढील निर्णय घेईल. समोर आलेल्या माहितीनुसार लखनौ अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेचे ग्राहक आता ३० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत. तर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड सीतापूर या बँकेच्या ग्राहकांना ५० हजारापेक्षा जास्त रक्कम बँकेतून काढता येणार नाही. 

Web Title: rbi imposes restrictions on lucknow urban co operative bank and one another limits withdrawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.