Join us  

RBI नं लादले तीन सहकारी बँकांवर निर्बंध, वाचा ग्राहकांवर काय होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:41 PM

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने पुन्हा एकदा तीन सहकारी बँकांवर अनेक निर्बंध लादले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने पुन्हा एकदा तीन सहकारी बँकांवर अनेक निर्बंध लादले आहेत. तीन सहकारी बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता, रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक, बसमतनगर; करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूर आणि दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, विजयवाडा या तीन बँकांवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले आहेत. जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक, बसमतनगरवर लादलेल्या निर्बंधांमुळे ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.

याशिवाय, करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूरचे ठेवीदार त्यांच्या खात्यातून केवळ १० हजार रुपये काढू शकतात. आरबीआयने विजयवाडा येथील दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवरही निर्बंध लादले आहेत. या बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून जमा रकमेपैकी केवळ दीड लाखांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे.

यापूर्वीही काही बँकांवर निर्बंधकाही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने काही बँकांवर निर्बंध लादले होते. त्यात सर्वाधिक सहकारी बँका आहेत. या निर्बंधांमुळे ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने उत्तर प्रदेशातील दोन सहकारी बँकांवर अनेक निर्बंध लादले होते. यामध्ये लखनौ अर्बन सहकारी बँक आणि शहरी सहकारी बँक लिमिटेड, सीतापूर या बँकांचा समावेश आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक