Lokmat Money > बिझनेस न्यूज > आरबीआयने 3 बँकांना ठोठावला मोठा दंड; तुमचे यापैकी कोणत्याही बँकेत खाते असेल तर लगेच तपासा...

आरबीआयने 3 बँकांना ठोठावला मोठा दंड; तुमचे यापैकी कोणत्याही बँकेत खाते असेल तर लगेच तपासा...

RBI imposes 5 lakh penalty on 3 co-operative banks : याआधी मार्चमध्येही रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने ८ बँकांना दंड ठोठावला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 03:43 PM2022-04-05T15:43:23+5:302022-04-05T15:43:48+5:30

RBI imposes 5 lakh penalty on 3 co-operative banks : याआधी मार्चमध्येही रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने ८ बँकांना दंड ठोठावला होता.

rbi imposes rs 5 lakh penalty on 3 co-operative banks see details | आरबीआयने 3 बँकांना ठोठावला मोठा दंड; तुमचे यापैकी कोणत्याही बँकेत खाते असेल तर लगेच तपासा...

आरबीआयने 3 बँकांना ठोठावला मोठा दंड; तुमचे यापैकी कोणत्याही बँकेत खाते असेल तर लगेच तपासा...

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ३ सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. या तिन्ही बँकांना आरबीआयने ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी दोन बँका महाराष्ट्रातील आणि एक पश्चिम बंगालमधील आहे. याआधी मार्चमध्येही रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने ८ बँकांना दंड ठोठावला होता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यासंदर्भात एक निवेदन जारी केले असून, 'फलटन येथील यशवंत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला (Yashwant Cooperative Bank Limited)  उत्पन्न, मालमत्ता वर्गीकरण, तरतुदी आणि इतर समस्यांवरील सूचनांचे पालन न केल्याबद्दल २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईस्थित कोकण मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडलाही (Kokan Mercantile Co-operative Bank Ltd) २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, कोलकाता येथील समता को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँकेलाही (the Samata Cooperative Development Bank) एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

याआधीही ८ बँकांना आकारला होता दंड
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India -RBI) याआधी देखील १४ मार्च २०२२ रोजी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात, हिमाचल आणि उत्तर प्रदेशातील ८ सहकारी बँकांना १२ लाखांहून अधिक रुपयांचा दंड आकारला होता. भारतीय रिझर्व्ह बँकांचे नियम आणि सूचना न पाळल्याबद्दल या बँकांना दंड ठोठावण्यात आला होता.

या अंतर्गत आरबीआयने मणिपूर महिला सहकारी बँक लिमिटेड (मणिपूर), युनायटेड इंडिया सहकारी बँक लिमिटेड (उत्तर प्रदेश), जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक (नरसिंहपूर), अमरावती मर्चंट सहकारी बँक लिमिटेड (अमरावती), फैज मर्केंटाइल सहकारी बँक लिमिटेड (नाशिक) आणि नवनिर्माण सहकारी बँक लिमिटेड (अहमदाबाद) यांना दंड ठोठावण्यात आला.
 

Web Title: rbi imposes rs 5 lakh penalty on 3 co-operative banks see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.