Lokmat Money > बिझनेस न्यूज > फ्रीचे दिवस संपले? आता UPI पेमेंटवरदेखील चार्ज लागणार, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

फ्रीचे दिवस संपले? आता UPI पेमेंटवरदेखील चार्ज लागणार, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

येत्या काळात यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून फंड ट्रान्सफर करणं महागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यूपीआय आधारित व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 11:52 AM2022-08-19T11:52:14+5:302022-08-19T11:53:48+5:30

येत्या काळात यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून फंड ट्रान्सफर करणं महागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यूपीआय आधारित व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे.

rbi is looking to introduce charges on upi based transfer | फ्रीचे दिवस संपले? आता UPI पेमेंटवरदेखील चार्ज लागणार, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

फ्रीचे दिवस संपले? आता UPI पेमेंटवरदेखील चार्ज लागणार, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

नवी दिल्ली-

येत्या काळात यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून फंड ट्रान्सफर करणं महागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यूपीआय आधारित व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. फंड ट्रान्सफर करण्यासाठी होणारा खर्च भरुन काढण्यासाठी रिझर्व्ह बँक या योजनेवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेनं डिस्कशन पेपर ऑन चार्जेस इन पेमेंट सिस्टम जारी केलं आहे आणि शुल्क आकारण्याबाबत लोकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया मागितल्या आहेत.

ऑपरेटर म्हणून रिझर्व्ह बँकेला आरटीजीएसमधील मोठ्या गुंतवणुकीची आणि ऑपरेटिंग खर्चाची भरपाई रिझर्व्ह बँकेला करावी लागते. बँकेच्या म्हणण्यानुसार यामध्ये जनतेचा पैसा गुंतवला गेला आहे, असा खर्च काढून टाकणे आवश्यक आहे. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेनं हेही स्पष्ट केलं की रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटमध्ये आकारलं जाणारं शुल्क म्हणजेच आरटीजीएस हे कमाईचं साधन नाही. त्यापेक्षा ही सुविधा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहावी यासाठी या शुल्कातून सिस्टीमचा खर्च वजा केला जाईल. अशा सेवांसाठी शुल्क आकारणं योग्य आहे का?, अशी विचारणा करण्यात आली आहे. 

शुल्क आकारण्यामागे नेमका उद्देश काय?
UPI च्या माध्यमातून रीअल टाईम पैसे ट्रान्फरची सुविधा ग्राहकांना मिळते. त्याच वेळी रिअल टाइम सेटलमेंट देखील सुनिश्चित करतं. मध्यवर्ती बँकेच्या मते, कोणत्याही जोखमीशिवाय हा सेटलमेंट आणि निधी हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे. ज्यावर खूप खर्च येतो. रिझव्‍‌र्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, मोफत सेवा दिल्यास एवढ्या महागड्या पायाभूत सुविधांच्या तयारी आणि अंमलबजावणीचा मोठा खर्च कोण उचलणार, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारण्याचा विचार केला जात आहे.

Web Title: rbi is looking to introduce charges on upi based transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.