Join us

20 रुपयांची नवीन नोट येणार, जाणून घ्या खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 1:01 PM

आपल्या हातात नवीन 500 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आरबीआयने दिली होती. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 20 रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे.

ठळक मुद्दे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 20 रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे. महात्मा गांधी सिरीज असलेल्या नव्या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे. नव्या नोटेचा आकार हा 63mmx129mm असणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. 

नवी दिल्ली - आपल्या हातात नवीन 500 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आरबीआयने दिली होती. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 20 रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे. भारतीय चलन व्यवस्थेमध्ये नवीन वैशिष्टये आणि नव्या रंगातील 20 रुपयांची नोट चलनात आणली जाणार आहे. महात्मा गांधी सिरीज असलेल्या नव्या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे. 

20 रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरव्या आणि पिळव्या रंगाच्या मिश्रणातील हिरवट पिवळा रंग असणार आहे. या नोटेच्या मागील बाजूस वेरुळ लेणींचे चित्र असणार आहे. महात्मा गांधी सिरीज असलेल्या नव्या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे. 20 रुपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटांचा देखील वापर कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्या नोटेचा आकार हा 63mmx129mm असणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) 500 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात येणार आहेत. यासंबंधीची माहिती भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. 

200 रुपयांची नोट : भारतीय रिझर्व्ह बॅंक महात्मा गांधी सिरीज असलेली 200 रुपयांची नवीन नोट जारी करणार आहे. या नोटांवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे. 200 रुपयांच्या नवीन नोटांची डिझाइन आधीच्या नोटांसारखीच असणार आहे. तसेच, 200 रुपयांच्या नवीन नोटा व्यवहारात आणल्यानंतर आधीच्या नोटाही स्वीकारल्या जाणार आहेत. 

500 रुपयांची नोट : भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून जारी करण्यात येणाऱ्या 500 रुपयांच्या नोटांवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असणार आहे. या नोटा सुद्धा बॅंक महात्मा गांधी सिरीजच्या असणार आहेत. 500 रुपयांच्या नवीन नोटांची डिझाइन आधीच्या नोटांसारखीच असणार आहे. तसेच, 500 रुपयांच्या नवीन नोटा व्यवहारात आणल्यानंतर आधीच्या नोटाही स्वीकारल्या जाणार आहेत. 

 

टॅग्स :पैसाभारतीय रिझर्व्ह बँकव्यवसाय