Lokmat Money > बिझनेस न्यूज > खुशखबर! RBI चा मोठा निर्णय, आता 20 देशांतील नागरिकांना 'या' सुविधेचा वापर करता येणार

खुशखबर! RBI चा मोठा निर्णय, आता 20 देशांतील नागरिकांना 'या' सुविधेचा वापर करता येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युपीआय संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. G-20 देशांतील प्रवाशांना भारतात राहताना मोबाइल-आधारित UPI वापरण्याची परवानगी देण्यासाठी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 12:24 PM2023-02-11T12:24:27+5:302023-02-11T12:25:21+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युपीआय संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. G-20 देशांतील प्रवाशांना भारतात राहताना मोबाइल-आधारित UPI वापरण्याची परवानगी देण्यासाठी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

rbi issues circular allowing travellers from g20 nations to use upi in india | खुशखबर! RBI चा मोठा निर्णय, आता 20 देशांतील नागरिकांना 'या' सुविधेचा वापर करता येणार

खुशखबर! RBI चा मोठा निर्णय, आता 20 देशांतील नागरिकांना 'या' सुविधेचा वापर करता येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युपीआय संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. G-20 देशांतील प्रवाशांना भारतात राहताना मोबाइल-आधारित UPI वापरण्याची परवानगी देण्यासाठी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.  UPI एक पेमेंट प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर मोबाईल अॅपवर अनेक बँक खाती एकत्रित केली जाऊ शकतात. यावरुन पेमेंम सुरक्षित करता येते. 

सध्या देशात डिजीटल पेमेंट सिस्टीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. युपीआद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पैसे दुसऱ्या बँक खात्यात कुठूनही ट्रान्सफर आणि ऑर्डर करू शकता. भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना ते वापरण्याची परवानगी आरबीआयने आधीच जाहीर केली होती. आता G-20 देशांतील प्रवाशांना निवडक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येण्यापासून ही सुविधा सुरू होईल. यानंतर, ही सुविधा देशातील सर्व प्रवेश बिंदूंवर जारी केली जाईल. भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले. G-20 हा जगातील विकसित आणि विकसनशील देशांचा मंच आहे.

परकीय गुंतवणूकदारांना मुंबईतच हवा ‘आशियाना’; दोन वर्षांत प्रथमच भारतीय शहराचा समावेश

यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे . UPI द्वारे पेमेंट जानेवारीमध्ये मासिक आधारावर 1.3 टक्क्यांनी वाढून सुमारे 13 लाख कोटी रुपये झाले आहे.

या सुविधेमुळे बाहेच्या देशातील येणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. 
 

Web Title: rbi issues circular allowing travellers from g20 nations to use upi in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.