Join us  

RBI चा कर्जदारांना धक्का; रेपो रेट पुन्हा वाढवल्यानं EMI आणखी वाढणार, 'बजेट' कोलमडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 10:21 AM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा कर्जदारांना धक्का दिला आहे. रेपो रेट पुन्हा ०.२५ टक्क्यांनी वाढवले आहेत. 

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा कर्जदारांना धक्का दिला आहे. रेपो रेट पुन्हा ०.२५ टक्क्यांनी वाढवले आहेत. आरबीआयच्या पतधोरणात बदल करताना व्याजदरात ०.२५ टक्के वाढ करण्यात आली आहे. यासोबतच रेपो दरातही ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६.५० टक्के झाला आहे.  'गेल्या जवळपास ३ वर्षांतील विविध आव्हानांमुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांसमोर चलनविषयक धोरणाच्या पातळीवर आव्हान उभे राहिले आहे, असं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले .

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी RBI ने गेल्या वर्षी मे पासून रेपो दरात एकूण २.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ प्रामुख्याने रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे झाली. सन २०२२ मध्ये सरकारने सलग 5 वेळा रेपो दरात वाढ केली आहे. यामध्ये शेवटची वाढ डिसेंबर 2022 मध्ये झाली होती.

अदानी समुहासाठी आनंदाची बातमी! अदानींनी केले कमबॅक, रेटिंग एजन्सीने दिली महत्वाची माहिती

मार्च २०२३ मध्ये चलनवाढीचा दर ५ टक्क्यांपर्यंत खाली आणावा लागेल, असंही तज्ज्ञांनी म्हटले होते. एप्रिलमध्ये ते ४.२ टक्क्यांपर्यंत नेले जाणे अपेक्षित आहे. सरकार पतधोरणाच्या बैठकीत रेपो दरात बदल करणार नसल्याचे बोलले जात होते.  सध्या रेपो दर ६.२५ टक्के होते. यात आता वाढ करण्यात आली आहे.  २०२३-२४ या आर्थिक वर्षात सरकारी सिक्युरिटीजची मागणी आणि पुरवठा यामध्ये २ लाख कोटी रुपयांची तफावत असावी आणि ही तफावत आरबीआय ओपन मार्केट ऑपरेशन्सद्वारे भरून काढेल किंवा दुसऱ्या सहामाहीत बदलेल अशी अपेक्षा आहे. 

बँक आपले कर्ज दर रेपो दरांच्या दरांवरूनच ठरवते. दर वाढले तर गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज अशी सर्व प्रकारची कर्जे महाग होतात. रेपो दर हे दर आहेत ज्यावर RBI बँकांना कर्ज देते, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक